अमरावतीत भररस्त्यावर गोळीबार, शाळकरी मुलगी जखमी

येथील पठाण चौकानजीकच्या चारा बाजार परिसरात एका व्यक्तीने भररस्त्यावर केलेल्या गोळीबारात १३ वर्षीय शाळकरी मुलगी जखमी

अमरावतीत भररस्त्यावर गोळीबार, शाळकरी मुलगी जखमी
( संग्रहित छायचित्र )

अमरावती येथील पठाण चौकानजीकच्या चारा बाजार परिसरात एका व्यक्तीने भररस्त्यावर केलेल्या गोळीबारात १३ वर्षीय शाळकरी मुलगी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. हल्लेखोराला अन्य कुण्या व्यक्तीवर गोळी झाडायची होती. परंतु, चुकून गोळीबारात ही मुलगी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सदफ परवीन नौशाद कुरेशी (१३, रा. हैदरपुरा) असे जखमी मुलीचे नाव आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा चौक ते चारा बाजार मार्गावर ही घटना घडली. अहमद खान असे या हल्लेखोराचे नाव असून तो गोळी झाडल्यानंतर पळून गेला. अहमद खानने रस्त्यावर अचानक गोळी झाडली. अहमद खानचे लक्ष्य अन्य कुणीतरी व्यक्ती होती, पण ती व्यक्ती बचावली. रस्त्यावरून जात असलेल्या सदफ परवीन हिला गोळी लागली ती खाली कोसळली. जखमी अवस्थेत तिला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोराचा शोध सुरू करण्यात आला असून नागपुरी गेट पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. या घटनेने शहर पुन्हा एकदा हादरले आहे. शहरात याीजर्वीही गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Firing on the road in amravati school girl injured amy

Next Story
गोंदिया : वाहने पडत होती बंद, तपासणी केली असता लक्षात आले की पेट्रोल पंपावर पेट्रोल ऐवजी पाण्याची विक्री
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी