लोकसत्ता टीम

चंद्रपूर: अनेकांना शरीरातील अवयवाबद्दल ज्ञान आहे. मात्र, त्यांना जवळून बघण्याची संधी कधी मिळाली नाही. सर्वसामान्य नागरिकांना व विद्यार्थ्यांना मानवी शरीरातील अवयवाबद्दल अधिक माहिती मिळावी त्यांना अवयवाचे कार्य जाणून घेता यावे यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरिरशास्त्र विभागाच्या वतीने अवयव प्रदर्शन आयोजित केले आहे.

yavatmal, Fire Breaks Out, Gynecology Department, Yavatmal government Medical College, No Casualties Reported, vasantrao naik government Medical College , fire in hospital, fire in yavatmal hospital,
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया गृहास आग, रूग्ण नसल्याने जीवितहानी टळली
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

या प्रदर्शनाला जिल्हाभरातील ६ हजार शाळकरी विद्यार्थ्यांनी भेटी देत मानवी मेंदू, फुफ्फुसे, हृदय, यकृत, आतडे, वृषण, प्लीहा जवळून बघत या अवयवाचे कार्य जाणून घेतले. शरीरातील अवयव किती महत्वपूर्ण कामगिरी बजावतात यांची माहिती जाणून घेतली.

आणखी वाचा- यवतमाळ: जिल्हा परिषदेच्या ५६ विद्यार्थ्यांना मिळाली हवाईसफर करण्याची संधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शरीरशास्त्र विभागाच्या वतीने १६ ते २१ मार्च या कालावधी दरम्यान मानवी अवयव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मानवी शरीरातील विविध अवयव प्रदर्शनीसाठी ठेवण्यात आले आहे. यासोबतच विविध सामाजिक विषयांवर जागरूकता निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. यामधे मानवी मेंदू, मृतदेह, फुफ्फुसे, हृदय, यकृत, आतडे, वृषण, प्लीहा इत्यादी अवयव शाळकरी विद्यार्थ्यांना दाखवून त्यांचे कार्य समजावून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच हा प्रयोग होत आहे. त्यामुळे या प्रदर्शनाला शाळकरी विद्यार्थी व नागिरकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत चंद्रपूर शहरासह जिल्हाभरातील किमान पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला आहे.

आणखी वाचा- नक्षल्यांकडून विद्यार्थ्याची हत्या प्रकरण: चौकशीच्या नावाखाली निर्दोषांना अटक, मर्दहूर ग्रामसभेचा पोलिसांवर आरोप

या प्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. अशोक नितनवरे, शरीररचना विभाग प्रमुख डॉ. श्रुती मामीडवार, तसेच महाविद्यालय सरचिटणीस विशाल बिराजदार, रोहित नाईकवाडे, नबा शिवजी, विराज चाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्याथी्र अनमोल पडोळे, समृद्धी शिंदे, अदिती खोडवे, जान्हवी वानखेडे, नेत्रा कडू, प्राजक्ता बावनकर, गणेश थोरात, हनुमान टाले, श्रेयस शिरसागर, पल्लवी भगत, साची वानखेडे, सुकन्या बेलोकर, शुभम हेंबाडे, अभिषेक सारोकार, दीप काळे, आस्था आडे, गार्गी बोरोकर, प्रसाद आबादार, साक्षी अवचार, सिद्धी सोमाणी, नताशा प्रभू, दीक्षा यादव, वैष्णवी चव्हाण, देवेन जैन, निनांशु गंदेचा, साकेत करहाले, तेजस पाठक, वैष्णवी चव्हाण हे शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना अवयवाचे महत्व पटवून देत आहे. विद्यार्थ्यांचे मानवी शरिरातील अवयवाचे कार्य, तसेच विकृतीमुळे अवयवावर होणारे परिणाम जाणून घेतले.