वाशीम : सलग पाच वेळा खासदार, दिग्गज नेत्यांचा पराभव म्हणून ओळख असलेल्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी नाकारून पक्षाने जिल्हा परिषद आणि विधानसभेला पराभूत झालेल्या राजश्री पाटील यांना उमेदवारी देत अनेकांना धक्काच दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मै मेरी झाशी नही दूंगी म्हणत उमेदवारीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करीत असताना खासदार भावना गवळी पंचवीस वर्षानंतर प्रथमच लोकसभेच्या निवडणुकीत नसल्याने समर्थक अस्वस्थ आहेत. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्री उपस्थित असताना त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनला असून त्या काय भूमिका घेतात, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा…चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर

विदर्भातील शिवसेनेच्या ताकदवान नेत्यांमध्ये खासदार भावना गवळी यांचा समावेश होतो. २०१९ मध्ये सलग पाचव्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकून भावना गवळी यांनी आपला राजकीय दबदबा सिद्ध केला होता. तर २०२४ च्या त्या संभाव्य उमेदवार म्हणून सहाव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याआधीच त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या भावना गवळी गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील राजकारणात समर्थपणे पाय रोवून उभ्या आहेत. मात्र एकदाही पराभूत न झालेल्या खासदार भावना गवळी यांना भाजप व पक्षातील अंतर्गत विरोधामुळे उमेदवारी नाकरण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.

हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींची ८ एप्रिलला चंद्रपुरात सभा

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघ व त्यापूर्वी वाशीम लोकसभा मतदार संघात खासदार भावना गवळी यांचाच दबदवा दिसून आला. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांनी काँग्रेस चे हरिभाऊ राठोड यांचा ५६ हजार मतांनी पराभव केला. २०१४ मध्ये शिवाजी राव मोघे यांचा ९३ हजार तर २०१९ मध्ये माणिकराव ठाकरे यांचा १ लाखाच्या फरकाने पराभव केला होता. मागील तीन टर्म च्या लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांचे मताधिक्य हे चढत्या क्रमांकाचे राहिले आहे. असे असताना त्यांची उमेदवारी जाहीर होईल, अशी स्थिती असताना उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसी शिवसेना शिंदे गटाला उमेदवार आयात करावी लागला.

यवतमाळ माहेर असलेल्या राजश्री पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला. राजश्री पाटील ह्या हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यांनी जिल्हा परिषद व विधानसभा निवडणूक लढाविली होती. मात्र त्या पराभूत झाल्या होत्या. खासदार हेमंत पाटील यांना शिवसेना शिंदे गटाकडून हिंगोली येथून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांना भाजप मधून कडाडून विरोध झाल्याने अखेरच्या क्षणी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना भावना गवळी यांना डावलून यवतमाळ वाशीम मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

हेही वाचा…वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असता भावना गवळी गैरहजर होत्या. त्यांची उमेदवारी जाहीर करावी, यासाठी त्यांचे समर्थकांनी आधीपासूनच जोर लावला होता. उमेदवारीसाठी गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. मात्र तरीही त्यांना डावलून महायुतीला दुसऱ्या जिल्ह्यातून उमेदवार आयात करून भावना गवळी यांना चेकमेट दिल्याने सर्वांनाच धक्का दिल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. आता त्या काय भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First time in 25 years bhavana gawali did not get ticket for washim lok sabha seat what will her next move pbk 85 psg
First published on: 05-04-2024 at 11:28 IST