scorecardresearch

Premium

दहावीनंतर पाच करियरचे पर्याय, जे देतात पाच ते दहा लाखांपर्यंत नोकरीची हमी

नोकरीतील बदल पाहता विद्यार्थ्यांना अधिक कुशल बनवण्यासाठी कौशल्य किंवा डिप्लोमा म्हणजेच पदविका अभ्यासक्रमाची मागणी वाढत आहे.

five career options after 10th job guarantee 5 to 10 lakhs
दहावीनंतर पाच करियरचे पर्याय, जे देतात पाच ते दहा लाखांपर्यंत नोकरीची हमी (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता टीम

नागपूर: नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. विद्यार्थी आणि पालकही अनेकदा करियरची निवड करताना गोंधळतात. त्यामुळे तुम्ही जर योग्य करिअर निवड करू शकत नसाल तर तुमच्या कामाचे हे पाच करिअरचे पर्याय आहेत. नोकरीतील बदल पाहता विद्यार्थ्यांना अधिक कुशल बनवण्यासाठी कौशल्य किंवा डिप्लोमा म्हणजेच पदविका अभ्यासक्रमाची मागणी वाढत आहे. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या आवडीवर निर्धारित आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमाचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर करिअरची निवड केली जाते. पाच ते दहा लाखापर्यंत नोकरीची हमी देणाऱ्या अभ्यासक्रमविषयी जाणून घ्या.

abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
farah khan reacts to troll who criticised her
“गणपतीसमोर चपला घालू नकोस…”, ट्रोलरच्या कमेंटला उत्तर देत फराह खान म्हणाली…

डिप्लोमा इन होटल मॅनेजमेंट कोर्स विद्यार्थी दहावीनंतर करू शकतात. कित्तेक खासगी आणि सरकारी संस्थानांत हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. हा डिप्लोमा कोर्स एक वर्षाच्या कालावधीचा आहे. यासाठी ५० हजार ते एक लाख रुपये खर्च करावे लागतात. या क्षेत्रात जॉब करणाऱ्याची सरासरी नोकरी दोन लाख ते ४ लाख रुपये वार्षिक असते.

हेही वाचा…‘प्लास्टिक’च्या भस्मासुरामुळे अकोल्याचे पर्यावरण धोक्यात

याशिवाय दहावीनंतर तीन वर्षांचा इंजिनीअरिंग डिप्लोमा कोर्सही करता येतो. दहावीनंतर हा सर्वात लोकप्रीय कोर्स आहे. या कोर्ससाठी देशभरात विविध कॉलेज आणि संस्थानांमध्ये शिकता येते. सायन्स आणि टेक्नॉलॉजीत रुची असणारे विद्यार्थी या कोर्सबाबत विचार करू शकतात. हा कोर्स केल्यानंतर कॅम्पस प्लेसमेंटमध्ये चांसेस चांगले आहेत. या कोर्सनंतर अनुभव घेतल्यास ८ लाखांपर्यंत सॅलरी मिळते.

हेही वाचा… नागपूरचे ‘व्हीएनआयटी’ विशिष्ट विचारधारेच्या प्रचार-प्रसाराचे केंद्र! जाणून घ्या काय घडले असे…

यासोबतच डिप्लोमा इन डिजीटल मार्केटिंग, डिप्लोमा इन फॉर्मसी, डिप्लोमा इन अग्रीकल्चर सायन्स हे अभ्यासक्रम करता येतात. कृषी आणि कृषी विज्ञानात रस असणारे विद्यार्थी दहावीनंतर हा अभ्यासक्रम करू शकतात. या कोर्सनंतरही नोकरीची हमी असून उत्तम वेतन मिळते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 11:38 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×