नागपूर : वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या सूचनेनंतरही वैद्यकीय संचालक डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शिक्षकांच्या संघटनेला मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचे पत्र दिले नसल्याने शिक्षकांचे आंदोलन सुरूच आहे.

त्यामुळे रुग्णांचे हाल कायम असून गेल्या चार दिवसांत मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी, डॉ. आंबेडकर रुग्णालयातील पाचशेच्या जवळपास नियोजित शस्त्रक्रिया स्थगित झाल्या आहेत.

Dates of 299 exams of Mumbai University summer session announced Mumbai
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर; दोन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी
कायद्याची पदवी, यूपीएससीसाठी सोडली सीएची नोकरी; जाणून घ्या IAS सोनल गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास
treatment in private hospitals
गरीब रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात उपचार मिळणार, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष कार्यान्वित
NBCC Recruitment 2024 93 JE Posts
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारमध्ये नोकरीची संधी! ‘या’ विभागात ९३ जागांची भरती; जाणून घ्या डिटेल्स

राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यलय व रुग्णालयातील चार हजार वैद्यकीय शिक्षकांनी बाह्य़रुग्ण सेवेसह सामान्य वार्डातील सेवा बंद केल्या आहेत. या विषयावर दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मुंबईत बैठक घेत संघटनेला काही आश्वासने दिलीत. संघटनेने लेखी आश्वासने मागितल्यानंतर वैद्यकीय संचालकांना तसे पत्र देण्याची सूचना मंत्र्यांनी दिली. परंतु संघटनेला पत्र न मिळाल्यामुळे त्यांनी आंदोलन कायम ठेवले आहे. वरिष्ठ डॉक्टर कामावर न परतल्यामुळे सर्वसामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये असंतोष वाढत आहे.

दरम्यान, आंदोलनावर तोडगा निघत नसल्याने या रुग्णालयांतील रुग्णांचे चौथ्या दिवशीही हाल झाले. येथील सर्व नियोजित शस्त्रक्रिया जवळपास बंद पडल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयांतील बाह्य़रुग्ण विभागातील रुग्णसंख्याही कमी झालेली दिसत आहे.

पत्र मिळाल्यावर पुढची दिशा ठरेल

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी संघटनेची सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीचे मिनिट्स किंवा लेखी पत्र वैद्यकीय संचालकांकडून संघटनेला मिळणार होते. अद्याप ते मिळाले नसल्याने आंदोलन कायम आहे. परंतु पत्र मिळाल्यावर याबाबत बैठक घेऊन पुढची दिशा निश्चित केली जाईल.

– डॉ. समीर गोलावार, सचिव, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना, महाराष्ट्र