scorecardresearch

Premium

यवतमाळ: पाच लाखांच्या खंडणीसाठी डोक्याला बंदूक लावली…

वाळू डेपोची तक्रार मागे घेण्यासाठी बंदुकीच्या धाकावर पाच लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री मारेगाव कोसारा शिवारात घडली.

extortion
यवतमाळ: पाच लाखांच्या खंडणीसाठी डोक्याला बंदूक लावली…( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

यवतमाळ : वाळू डेपोची तक्रार मागे घेण्यासाठी बंदुकीच्या धाकावर पाच लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री मारेगाव कोसारा शिवारात घडली. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला गजाआड केले.ललित उर्फ लल्ल्या अरुण गजभिये (३३, रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी, यवतमाळ), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बंदुकीच्या धाकावर धमकाविल्याची तक्रार सय्यद मन्सूर सय्यद दाऊद (३४, रा. डेहणकर ले-आउट) याने दिली. २०३२-२४ या कालावधीसाठी कोसारा येथील वर्धा नदीच्या वाळूघाटाचे टेंडर सय्यद मन्सूर याने घेतला असून, डेपोत वाळूसाठा करून ठेवला आहे.

३० ऑगस्ट रोजी ललित याने डेपोत काम करणार्‍या विकास झंजाळ याच्या मोबाइलवर फोन केला. मन्सूरचा भाऊ कादर फोन उचलत नाही. त्याच्याकडून पाच लाख रुपये हप्ता घ्यायचा आहे. पैसे दिले नाही तर तक्रार करण्यात येईल, असा निरोप दिला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली. त्या तक्रारीवरून यवतमाळ तहसीलदारांनी गोधणी रोड स्थित असलेल्या खदानीवर छापा टाकला.

Eligibility determination campaign
गिरणी कामगार, वारसांच्या पात्रता निश्चितीचे अभियान आता वांद्र्यातील समाज मंदिर सभागृहात
panvel municipal corporation, title of environmental ambassador, families who donate ganesh idols, title of environmental ambassador for donating ganesh idols
पनवेल : गणेश मूर्तीदान करणाऱ्या कुटूंबियांना ‘पर्यावरण दूत’ पदवी महापालिका देणार
marathwada irrigation projects
मराठवाड्यातील कोरड्या सिंचनाच्या दुसऱ्या भागाचे ‘ढोलताशे’
Crime Branch teams to prevent theft incidents
गणेशोत्सवाच्या काळात पिंपरीत चोरीच्या घटना रोखण्यासाठी गुन्हे शाखेची पथके; दामिनी पथक सज्ज

हेही वाचा >>>शरद पवार यांनी आरक्षणावर बोलू नये; बावनकुळे असे का म्हणाले…

त्या ठिकाणी गैरप्रकार आढळून आला नाही. मंगळवारी कोसारा वाळू डेपोची तक्रार करण्यात आली. बुधवारी मन्सूर हा आपल्या कामगारासह कोसारा शिवारात उभा असताना ललित गजभिये आपल्या एक अन्य साथीदारासह कारने आला. सांगीतल्याप्रमाणे वाळू घाटाचा हप्ता दिला नाही, असे म्हणत बंदूक मन्सूरच्या डोक्याला लावली. तर, दुसर्‍या साथीदाराने चाकू पोटाला लावला. त्याने आरडाओरड करताच कामगार धावून आले. मन्सूर सेठला सोडून द्या. तुम्हाला हप्ता मिळून जाईल, अशी विनंती कामगारांनी केली. त्यामुळे ललित घटनास्थळावरून निघून गेला. याप्रकरणी सय्यद मन्सूर याने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्रे वेगात फिरवून ललित गजभिये याला यवतमाळातून अटक केली.पुढील तपास ठाणेदार जनार्दन खंडेराव, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर सावंत करीत आहेत.या घटनेने वाळू घाटातील अनागोंदी पुन्हा चव्हाट्यावर आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Five lakh extortion demanded to withdraw complaint of sand depot in yavatmal nrp 78 amy

First published on: 15-09-2023 at 10:31 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
मराठी कथा ×