scorecardresearch

वर्धा: नाद खुळा! युवा शेतकऱ्याने साकारले ‘फाईव्ह स्टार’ मचान

रात्री बेरात्री शेतात थांबायची वेळ शेतकऱ्यांसाठी नित्याचीच. त्यात वन्यप्राण्यांचा धोका असतोच. म्हणून शेतातच सोयीयुक्त निवारा केल्या जातो.

Five star scaffolding made by a young farmer wardha
युवा शेतकऱ्याने साकारले 'फाईव्ह स्टार' मचान

रात्री बेरात्री शेतात थांबायची वेळ शेतकऱ्यांसाठी नित्याचीच. त्यात वन्यप्राण्यांचा धोका असतोच. म्हणून शेतातच सोयीयुक्त निवारा केल्या जातो. त्यास मचान म्हटल्या जाते. पण हे मचान सुध्दा पंचतारांकित हॉटेलातील खोलीला लाजवेल असे बांधण्याची बाब कमालच म्हणावी. पण तसे धाडस आर्वी तालुक्यातील कासारखेड येथील युवा शेतकऱ्याने दाखविले आहे.

हेही वाचा >>>नागपूर : धक्कादायक! नऊ दिवसांच्या ‘नकोशी’चा अडीच लाखांत सौदा

बाजूच्या शेतात रात्री थांबलेल्या शेतकऱ्यास बिबट्याने फरफटत नेल्याचे माहित झाल्यावर योगेश माणिक लिचडे यांनी स्वतःच्या शेतात सुरक्षित मचान बांधण्याचा निर्णय घेतला. सहा फूट उंच व साडे पाचशे किलो वजनाचे मचान त्याने बांधले. ते सुसज्ज व्हावे म्हणून सोलर पॅनल बसवून पंखा व सौर दिवे लावलेत. रेडिओ पण वाजतो. मोबाईल चार्जिंगची सोय आहेच. अंतर्गत सजावट व रंगसंगती मनोवेधक अशी. दोघे जण निवांत बसू शकतात.यात बसून योगेश शेताची निगराणी करीत आहे. या आगळयावेगळ्या मचानाची चर्चा दूरवर पसरल्यास नवल ते काय. आता परिसरातील शेतकरी हा रुबाब पाहण्यास भेट देत आहे.सोबतच आम्हालाही असे बांधून दे म्हणून विनंती करीत आहे.

हेही वाचा >>>नागपूर : ‘आरटीओ’ कार्यालय ‘स्क्रॅप’ धोरणापासून अनभिज्ञ!, माहिती अधिकारात माहिती देण्यासही टाळाटाळ

योगेश म्हणतो, की शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करणार. कमी खर्चात बांधून देण्याची तयारी आहे. हे मचान वन्यजीव व नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित राहणार आहे. शेतकऱ्यांसाठी हे वरदान ठरू शकते,असे मत त्याने व्यक्त केले

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 10:16 IST

संबंधित बातम्या