Nagpur Flood Situation : नागपूरमध्ये शनिवारी सकाळी आलेल्या महापुरात एका महिलेचा मृत्यू झाला तर ३५० जणांना सुरक्षित स्थळी हलवले. पावसामुळे अंबाझरी तलाव, नाग नदी, पिवळी नदी आणि स्थानिक नाला ओव्हरफ्लो झाल्यामुळे शहरातील अनेक भागांत विशेषत: अंबाझरी तलाव, नाग नदीजवळील सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली.

हेही वाचा – शिक्षकी पेशाला काळीमा! अमरावतीतील नामांकित शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल

हेही वाचा – नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “एका आजींचा मृत्यू…”

धरमपेठ, शंकर नगर, अंबाझरी एनआयटी, झाशी राणी चौक, पंचशील चौक, कांचीपुरा, कॉटन मार्केट, लकडगंज आदी भागांत पाणी शिरले आणि घरांमध्ये पाणी शिरले. अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कर आणि आपदा मित्र पथकांनी पुरात अडकलेल्या ३५० व्यक्तींची सुटका केली. पुरामुळे एक व्यक्ती आणि १४ गुरांचा मृत्यू झाला. श्रीमती मीराबाई पिल्ले (वय ७०) रा. महेश नगर, असे मृत महिलेचे नाव आहे.

Story img Loader