scorecardresearch

Premium

Nagpur Rain : मुसळधार पावसाचा तडाखा, शंकर नगरसह महावितरणचे अनेक सबस्टेशन पाण्यात; वीज पुरवठा खंडित

Nagpur Heavy Rain : नागपुरातील मुसळधार पावसामुळे शंकर नगर सबस्टेशन पाण्यात असल्याने रामनगर, अंबाझरीसह या सबस्टेशनवरील हजारो ग्राहक अंधारात आहे.

flood situation in nagpur city due to heavy rain, electric sub station down, no electricity in some part of city
Nagpur Rain Flood : मुसळधार पावसाचा तडाखा, शंकर नगरसह महावितरणचे अनेक सबस्टेशन पाण्यात; वीज पुरवठा खंडित

Nagpur Flood Situation : उपराजधानीला शुक्रवारी रात्रीपासून पावसाने झोडपल्याने महावितरणचे शंकर नगर आणि इतरही अनेक सब स्टेशन आणि वीज यंत्रणा पाण्यात गेली आहे. तर अनेक वस्तीमध्ये पाणी शिरल्याने महावितरणला रात्री २ पासूनच शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा बंद करावा लागला. त्यामुळे हजारो ग्राहक अंधारात आहेत.

हेही वाचा… नागपूर : अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो, तलावालगतच्या भागात दाणादाण; घराघरात पाणी शिरले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Buldhana Accident
बुलढाण्यात भरधाव ट्रक झोपडीत घुसला, १० मजुरांना चिरडलं, चार जण जागीच ठार
cleaning campaign at mumbai beach, mumbai municipal corporation, bmc cleaning campaign at sea area
मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग; महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थांकडून स्वच्छता मोहीम
Heavy rain Chandrapur
चंद्रपुरात मुसळधार, अनेक भागांत पाणी शिरले; साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांना जलतरण तलावाचे स्वरूप
leopard roaming Eklahare area nashik imprisoned cage forest department
नाशिक: एकलहरे परिसरात बिबट्या जेरबंद

हेही वाचा… Photos : नागपूरकरांची मुसळधार पावसामुळे दाणादाण, अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो, वस्त्यांमध्ये पाणी

नागपुरातील मुसळधार पावसामुळे शंकर नगर सबस्टेशन पाण्यात असल्याने रामनगर, अंबाझरीसह या सबस्टेशनवरील हजारो ग्राहक अंधारात आहे. सरस्वती कॉलनी, भांगे लॉन (त्रिमूर्ती नगर), ऑरेंज सिटी टॉवर, इटर्निटी मॉल, बँक ऑफ महाराष्ट्र, संस्कृती संकुल, धनवटे (रीजेंट sdn), वर्मा लेआउट, अंबाझरी लेआउट, (शंकर नगर विभाग क्षेत्र), अजमेरा एफडीआर, नरेश चंद्र एफडीआर, बुर्डी, रीजेंट विभाग, लँड मार्क एफडीआर, धंतोली विभाग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे बंद ठेवले, तसेच इतरही अनेक Pफीडर बंद ठेवले जात आहे. बेसा- बेलतरोडी परिसरातील बराच भाग अंधारात आहे. सबस्टेशन, वीज वितरण पेटी, रोहित्र, लोकांच्या घरात पाणी शिरल्याने खबरदारी म्हणून येथील वीज पुरवठा खंडित केल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Flood situation in nagpur city due to heavy rain electric sub station down no electricity in some part of city mnb asj

First published on: 23-09-2023 at 08:31 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×