scorecardresearch

वाहतूक नियम पाळा, ब्रांडेड वस्तूंवर विशेष सूट मिळवा; उपराजधानीतील दहा चौकांत पथदर्शी प्रकल्प

बेशिस्तांना ब्रांडेड वस्तूंवर विशेष सूटच्या निमित्ताने वाहतूक नियम पाळण्याची शिस्त लावण्याचा पथदर्शी प्रकल्प नागपुरातील दहा सिग्नलवर सुरू झाला आहे.

वाहतूक नियम पाळा, ब्रांडेड वस्तूंवर विशेष सूट मिळवा; उपराजधानीतील दहा चौकांत पथदर्शी प्रकल्प
फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम

सिग्नल ओलांडताच स्वयंचलित दहा ‘ट्रॅफिक रिवार्ड’ खात्यात

महेश बोकडे

नागपूर : देशभरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांना शिस्त लावण्याचे मोठे आव्हान सरकारवर आहे. या बेशिस्तांना ब्रांडेड वस्तूंवर विशेष सूटच्या निमित्ताने वाहतूक नियम पाळण्याची शिस्त लावण्याचा पथदर्शी प्रकल्प नागपुरातील दहा सिग्नलवर सुरू झाला आहे. येथून संबंधित वाहन शिस्तीने निघताच दहा ‘ट्रॅफिक रिवार्ड पाॅईंट’ स्वयंचलित वाहनधारकाच्या खात्यात जाईल. या पाॅईंटच्या मदतीने तरुणाला काही नावाजलेल्या ब्रांडवर विशेष सूट मिळेल.

हेही वाचा >>> अखेर अंधार दाटलाच!, उमरेड, भिवापूरच्या बऱ्याच भागात वीज पुरवठा खंडित

उपराजधानीतील इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये या अफलातून प्रकल्पाचे प्रदर्शन लागले आहे. तर या प्रकल्पाचा पथदर्शी प्रकल्पही नागपुरात सुरू झाला आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने सोशल-इंपॅक्ट इनोव्हेशन प्रा. लिमि. या कंपनीच्या स्टार्टअपला मदत केली आहे. नागपुरात हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास कालांतराने तो देशभरात राबवला जाईल. नागपुरातील पथदर्शी प्रकल्पानुसार लक्ष्मीनगर ते जपानी उद्यान, दीक्षाभूमी येथील दहा सिग्नलवर अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विशेष यंत्रणा उभारण्यात आली आहे.

हेही वाचा >>> नागपूर: महानिर्मितीकडून ६,१०० मेगावॅट उत्पादन, राज्यातील सकाळी ९ वाजताची स्थिती

प्रकल्पातील तरुणांच्या दुचाकींवर संबंधित कंपनीकडून फास्टॅगसदृश्य आरएफआयडी स्टिकर व मोबाईलवर एक ॲप डाऊनलोड करण्यात आले आहे. दुसरीकडे या कंपनीकडून दहाही सिग्नलवर आरएफआयडी स्टिकरचे स्वयंचलित वाचन करणारी यंत्रणा स्थापित आहे. त्यामुळे तरुणांचे वाहन नियम पाळत या सिग्नलवरून पुढे जाताच स्वयंचलित पद्धतीने संबंधिताच्या ॲपमध्ये १० ट्रॅफिक रिवर्ड पाॅईंट ॲड होतील. दरम्यान ॲप असलेल्या कंपन्यांचे पुमासह इतरही काही मोठ्या ब्रांडसोबत करार असेल. त्यानुसार या नियम पाळणाऱ्या व जास्त ‘रिवार्ड पाॅईंट’ असलेल्या वाहनधारकाला संबंधित कंपनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन वा ऑफलाईन वस्तू घेताना अतिरिक्त सूट देणार असल्याने संबंधितांचे पैसे वाचतील. त्यामुळे सर्वाधिक नियम मोडणाऱ्यांत पुढे असलेल्या तरुणांना या प्रकल्पाच्या माध्यमातून वाहतूक नियम पाळण्याची सवय निर्माण होऊ शकेल, असे सोशल इंप्लांट इनोव्हेशन प्रा. लिमि.चे हेड ऑफ पार्टनर नीलेश कोल्हारकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 11:24 IST

संबंधित बातम्या