आरोग्य विभागासह एफडीएची संयुक्त समिती गठित; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

नागपूर : उपराजधानीतील दहा वर्षांखालीली चार थॅलेसेमियाग्रस्त मुलांना ‘एचआयव्ही’ची बाधा झाली असून दूषित रक्त यासाठी कारणीभूत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. ‘लोकसत्ता’ने याबाबत वृत्त प्रकाशित करताच, आरोग्य उपसंचालक कार्यालयाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (औषध) संयुक्त अधिकाऱ्यांची समिती गठित केली. समितीने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
pm modi targets india alliance during his tamil nadu and kerala visit
‘इंडिया’ला पराभवाची खात्री! पंतप्रधान मोदींची केरळ, तमिळनाडू दौऱ्यात विरोधकांवर टीका

या समितीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने विभागीय रक्त संक्रमण अधिकारी डॉ. राज वाघमारे यांच्यासह एका एफडीए अधिकाऱ्याचा समावेश आहे. समितीने पहिल्या टप्प्यात गुरुवारी थॅलेसेमिया आणि सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे डॉ. विंकी रुघवानी यांची भेट घेत, संबंधित रुग्णांची माहिती जाणून घेतली. या मुलांना कोणत्या रक्तपेढीतून रक्ताचा पुरवठा झाला, हे समितीने जाणून घेतले. आरोग्य उपसंचालक कार्यालयाने तातडीने या समितीला चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे.

एचआयव्हीची लागण झालेल्या मुलांमध्ये एका तीन वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. तिला सात ते आठ महिन्यांपूर्वी एचआयव्हीचे निदान झाले. हे चारही मुले कामठी, हिंगणा व इतर भागातील आहेत. त्यातच थॅलेसेमियाच्या पाच मुलांना हिपेटायटीस सी आणि दोघांना हिपेटायटीस बी आजार जडल्याचेही निदर्शनास आले आहे. वेगवेगळय़ा रक्तपेढय़ांतून रक्ताचा पुरवठा आणि वेगवेगळय़ा रुग्णालयात ते लावून घेतल्यामुळे मुलांना एच.आय.व्ही.ची नेमकी लागण कुठून व कशी झाली, हे जाणून घेण्याचे आव्हान समितीपुढे आहे.

समितीला रुग्णांची संपूर्ण माहिती दिली आहे. हा गंभीर प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक थॅलेसेमियाग्रस्ताला ‘नॅट’ तपासणीनंतरच रक्तपुरवठा करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन धोरणात सुधारणा करण्याची गरज आहे.

डॉ. विंकी रुघवानी, अध्यक्ष, थॅलेसेमिया आणि सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया.

या प्रकरणाची संयुक्त चौकशी सुरू झाली आहे. चौकशी अहवाल लवकरात लवकर सादर करा, अशी सूचना समितीला करण्यात आली आहे. अहवालानंतरच या विषयावर  बोलने योग्य ठरेल.

डॉ. रवी धकाते, सहाय्यक उपसंचालक (नागपूर विभाग), सार्वजनिक आरोग्य विभाग.