व्याघ्र संरक्षणाऐवजी व्याघ्र पर्यटनाकडे व्यवस्थापनाचे अधिक लक्ष; रिसोर्ट लॉबीचा दबाव

रवींद्र जुनारकर

राज्याचा वन विभाग तथा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने वाघांचा संरक्षणाऐवजी ताडोबात पर्यटनाकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. ४५ हजार रुपयात पूर्ण दिवस सफारी पाठोपाठ आता २५ हजार रुपयात अर्धा दिवस सफारी सुरू करण्यात आली आहे. ताडोबातील सक्रिय रिसोर्ट लॉबीच्या दबावात सर्व निर्णय घेतले जात असल्याचा आरोप व्याघ्रप्रेमींकडून होत आहे. दरम्यान, ताडोबात एक दिवसाच्या व्याघ्र सफारीसाठी किमान ७५ हजारापेक्षा अधिकचा खर्च येत असल्याने व्याघ्र सफारी गरिबांची नाही तर श्रीमंतांसाठी आहे, अशी चर्चा आहे.

dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
way of dharavi redevelopment is cleared railway land finally transferred to DRP
धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, रेल्वेची २५.५७ एकर जमीन अखेर ‘डीआरपी’कडे हस्तांतरित

हेही वाचा >>>भंडाऱ्यात पठाण चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध; सिनेमागृहाबाहेर घोषणाबाजी करत पोस्टर जाळले

वाघांसाठी देशातच नाही तर जगात प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे जागतिक पर्यटक आकर्षित झाला आहे. हमखास व्याघ्र दर्शनामुळे देशविदेशातील पर्यटक येथे मुक्कामी येतात. यामुळे ताडोबा व्यवस्थापन आता व्याघ्र संरक्षणाकडे दुर्लक्ष करीत पर्यटनाकडे विशेष लक्ष देत आहे. सुरुवातीला पाच ते दहा हजारात होणारे ताडोबाचे पर्यटत आता लाखावर गेले आहे. ताडोबा बफर क्षेत्रात नुकतीच ४५ हजार रुपयात पूर्णवेळ सफारी सुरू करण्यात आली आहे. तर ताडोबा कोर झोनमध्ये ३७ हजार रुपयात पूर्ण वेळ फोटोग्राफी सफारी सुरू झाली आहे. फोटोग्राफी सफारीची बुकींग करताना तुम्हाला सुरूवातीला ७ हजार ५७५ रुपयात ऑनलाईन बुकींग देखील करावे लागते. हीच फोटोग्राफी बुकींग शनिवार किंवा रविवार या दिवशी करायची असेल तर ११ हजार ५७५ रुपये अधिक ३७ हजार रुपये मोजावे लागत आहेत. सकाळी ६.१५ वाजता सफरी सुरू होते तर सायंकाळी ६.१५ वाजता सफारी संपते. सलग बारा तासाची ही सफारी आहे.

हेही वाचा >>>नागपूर: समृद्धी महामार्गावर वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन; म्हणतात रस्त्यावर मृत मिळाल्यास तात्काळ विल्हेवाट लावा

फोटोग्राफी व पूर्ण वेळ सफारी पाठोपाठ ताडोबा बफर क्षेत्रात आता २५ हजार रुपयांमध्ये अर्धा दिवस सफारी सुरू करण्यात आली आहे. देवाडा – अडेगाव – जुनोना, कोलारा- मदनापूर – बेलारा, नवेगांव – अलीझंजा- निमढेला या मार्गावर ही अर्धवेळ सफारी सुरू झाली आहे. सकाळी ६.१५ ते दुपारी १२ व दुपारी १२ ते सायंकाळी ६ अशा दोन वेळात ही सफारी आहे. पूर्णवेळ व अर्धवेळ सफारीत एका जिप्सीत केवळ चार पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. ताडोबाची नियमीत सफारी ऑनलाईन बुकींग करताना ४ ते ५९ दिवसांपर्यंत ५ हजार ५७५ रुपये खर्च येतो. तिथेच ६० ते १२० दिवसांपर्यंत बुकींग करताना ७ हजार ५७५ रुपये खर्च येतो. शनिवार व रविवार या दोन दिवशी हा खर्च ११ हजार ५७५ इतका आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यापर्यंत ऑनलाईन बुकींग हाऊसफुल्ल असल्याची माहिती ऑनलाईन बुकींग ऑफीसरने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

दरम्यान, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात २३ जानेवारी रोजी ताडोबा कोर झोनच्या नवेगाव परिसरात एक वाघिण जिप्सीजवळ आली. जिप्सीचे लाईट व सायलेंसरला वाघिणीने तोंड लावले. सायलेंसर गरम असल्याने तिच्या तोंडाला हलका चटका लागला. जिप्सी वाघांपासून दूर ठेवावी असा नियम असताना गाईड व चालक पर्यटकांच्या आग्रहावरून जिप्सी वाघाच्या अगदी जवळ घेवून जात असल्याच्या अनेक घटन समोर येत आहेत.