नागपूर : वने आणि वन्यजीव संरक्षणात लोकसहभाग वाढवण्यासाठी राज्याच्या वनखात्याकडून विविध उपक्रम राबवले जातात. आता याच उपक्रमाचा एक भाग म्हणून वनगीतांची रचना तयार करण्यात येणार आहे. सोबतच संरक्षण आणि पोलीस खात्यात असणाऱ्या ‘बँड’ प्रमाणे वनखात्याचाही बँड तयार करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> ३० मार्च ते ६ एप्रिलदरम्यान ‘सावरकर गौरव यात्रा’

MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
maharashtra animal husbandry commissioner kaustubh diwegaonkar talking about survival of the fittest
माझी स्पर्धा परीक्षा : समाज म्हणून यशाच्या व्याख्या बदलायला हव्यात
IGI Aviation Bharti 2024
१२ वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी! IGI एव्हिएशनकडून १०७४ जागांसाठी भरती, एवढा मिळणार पगार

वनखात्याने या उपक्रमासाठी जंगल आणि वन्यजीवप्रेमी तसेच निसर्गप्रेमींसाठी एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. वनखात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सांस्कृतिक कार्यमंत्रीदेखील आहेत. अलीकडेच त्यांनी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची महाराष्ट्र गीत म्हणून निवड केली. याच पार्श्वभूमीवर वनखात्याचा ठसा सर्वत्र उमटवण्यासाठी त्यांनी खात्याची ओळख असणारे वनगीत आणि बँड तयार करण्याचे ठरवले आहे. जंगल आणि वन्यजीव संरक्षणात लोकांना सहभागी करून घेण्यासाठी तसेच खात्यातील संरक्षण फळीतील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे गीत व बँड महत्त्वाची भूमिका बजावेल, खात्याला सार्वजनिक व्यासपीठावर देखील ते वेगळी ओळख मिळवून देईल, असा विश्वास खात्याला आहे. वनखात्याकडून हरित सेना हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यासाठी देखील हे गीत आणि बँड प्रेरणादायी ठरणार आहे. या गीतासोबतच प्रतिज्ञा देखील तयार करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून येत्या ३० एप्रिलपर्यंत याबाबत प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत. वनगीताचे शब्द, संगीतासह हरितसेनेसाठी गीत, वनखात्याच्या बँडसाठी संगीत व हरित सेनेसाठी प्रतिज्ञा या चार घटकांसाठी वनखात्याने स्पर्धा आयोजित केली आहे. प्रत्येक श्रेणीतील गुणानुक्रमे पहिल्या तीन नोंदींना आकर्षक पारितोषिक आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.