Forest department fails to capture man-hunting CT 1 tiger nagpur | Loksatta

सावधान ! नरभक्षी सीटी १ वाघ देसाईगंज तालुक्यातील जंगलातच; जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश

वर्षभरापासून या वाघाने जवळपास १३ जणांचे बळी घेतले आहेत.

सावधान ! नरभक्षी सीटी १ वाघ देसाईगंज तालुक्यातील जंगलातच; जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश
सीटी १ वाघ

वनविभागाला सतत हुलकावणी देणारा सीटी १ या नरभक्षी वघाचे सध्या देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर आणि ऐकलपूरच्या जंगलात वास्तव्य असून यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. वर्षभरापासून या वाघाने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, देसाईगंज आणि भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील जवळपास १३ जणांचे बळी घेतले. त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाची चमू दिवसरात्र एक करीत असून त्यांना अद्याप यश आलेले नाही.

हेही वाचा- विश्लेषण : नक्षलग्रस्त गडचिरोलीत आता नरभक्षक वाघांचा धुमाकूळ? काय आहेत कारणे?

गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा या तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या सीटी १ या नरभक्षी वाघामुळे वनविभागाची चांगलीच दमछाक होते आहे. गेल्या ३ महिन्यापासून ताडोब्यातील विशेष पथक या वाघाला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यांना यश येत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पाहायला मिळत आहे. यामुळे शेतीची कामे ठप्प पडली आहेत. जनावरांना चरायला जंगलात घेऊन जाणे जीवघेणे झाले आहे. इतकेच नव्हे तर या परिसरातील मार्गावरून प्रवास करणेदेखील धोकादायक असल्याने नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नियोजन समितीच्या बैठकीत काँग्रेस-भाजपा आमदारांमध्ये ‘तू तू मैं मैं’

संबंधित बातम्या

वाशिम : ठाकरे गटाच्या महिला शहर प्रमुखावर हल्ला करण्यासाठी दिली होती २० लाखांची सुपारी; आरोपीला बिहारमधून अटक
देव तारी त्याला कोण मारी! वाघाने दुचाकीवर झडप घेतली अन्…
“हिंमत होतेच कशी?”, चित्रा वाघ राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंवर बरसल्या; म्हणाल्या, “कोणीतरी लिहून दिलं आहे आणि…”
भंडाऱ्यात रानटी हत्तींची घुसखोरी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार धानोरकरांना पुन्हा उमेदवारी देऊ नका, कारण…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“MPSC त उत्तीर्ण नाही झाला तरी गावाकडे…”, गोपीचंद पडळकरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
पुण्यातून व्यापाऱ्याचे अपहरण करणारा आरोपी राजस्थानमध्ये जेरबंद; प्रेमसंबंधातून अपहरणाचा प्रकार
शाहरुख खानने दिली मक्का मशिदीला भेट, प्रार्थना करतानाचे फोटो व्हायरल; कारण आहे एकदम खास
PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या, रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने केले सात विश्वविक्रम
पुणे: कात्रज प्राणी संग्रहालयातील गव्याचा मृत्यू