scorecardresearch

नागपूर : पुनर्मिलनाचा भावपूर्ण क्षण! …अन् मादी बिबटने बछड्याला घेतले घट्ट कवेत

कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून रात्रभर पाळत ठेवण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास सदर बछड्याचे आपल्या आईसोबत पुनर्मिलंन यशस्वीरित्या पार पडले.

नागपूर : पुनर्मिलनाचा भावपूर्ण क्षण! …अन् मादी बिबटने बछड्याला घेतले घट्ट कवेत

आई आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते यात दुमत नाही. मग आई ही हिंस्त्र श्वापदाची असो किंवा माणसाची. निश्चितच आईच आपल्या अपत्यासाठीचं प्रेम हे जीवापाड असतं याचं उदाहरण म्हणजे आर्वीलगतच्या दाहेगाव मुस्तफा येथील एका शेतात ऊस तोडणी सुरू असताना त्या ठिकाणी एका बिबट्याचा २५ दिवसांचा बछडा आढळून आला. 

हेही वाचा >>> वर्धा : अर्थसंकल्पातील भरीव तरतुदींचे श्रेय आमदाराचे नव्हेतर उपमुख्यमंत्र्यांच्या सचिवांचे!

गावकऱ्यांनी लगेच या घटनेची माहिती वनविभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी आर्वीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितिन जाधव, तंबाके, मेश्राम, सावंत, चव्हाण व इतर वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांना ऊस कटाई झालेल्या शेतात शावक दिसून आला असता त्यांनी लगेच त्या  बछड्याला ताब्यात घेत सदर बछड्याचे त्याच्या आई सोबत पुनर्मिलन होण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने प्रयत्न सुरू केले. या करिता पीपल फॉर एनिमल्स च्या वन्यजीव केंद्रातील चमूला पाचारण करण्यात आले. व संयुक्तरित्या मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, बछडा सुदृढ असल्याचे पीपल्स फॉर अनिमल येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत प्रमाणित करण्यात आले व त्याला एका मोठ्या कॅरेटच्या मदतीने योग्य ठिकाणी ठेवण्यात आले. 

हेही वाचा >>> यवतमाळ : पोलीस अधिकारीच अडकला सावकाराच्या पाशात!

कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून रात्रभर पाळत ठेवण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास सदर बछड्याचे आपल्या आईसोबत पुनर्मिलंन यशस्वीरित्या पार पडले. ही मोहीम उपवनसंरक्षक वर्धा राकेश सेपट व श्री बोबडे सहायक वन संरक्षक यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी आर्वी नितिन जाधव , पीपल फॉर अनिमल्स वन्यजीव बचाव केंद्राचे प्रभारी कौस्तुभ गावंडे,  ऋषिकेश गोडसे यांनी अथक प्रयत्न घेतले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 13:50 IST