Premium

“लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे…’’, वनमंत्री मुनगंटीवार यांची खा. धानोरकर यांना श्रद्धांजली

चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

dhanorkar sudhir munguntiwar
वनमंत्री मुनगंटीवार यांची खा. धानोरकर यांना श्रद्धांजली

चंद्रपूर : चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. यामुळे राज्याच्या राजकारणातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे, अशी खा. धानोरकर यांची ओळख होती. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तीनच दिवसांपूर्वी म्हणजे २७ मे रोजी खासदार धानोरकर यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर आज धानोरकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबावर जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून त्यांना सावरण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना माता महाकाली चरणी करतो, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Forest minister sudhir mungantiwar tribute to suresh dhanorkar rsj 74 ysh

First published on: 30-05-2023 at 14:04 IST
Next Story
अकोला : पश्चिम विदर्भातून पाच लाख क्विंटल अतिरिक्त हरभरा खरेदी; शासनाची अतिरिक्त उद्दिष्टाला मंजुरी, शेतकऱ्यांना दिलासा