scorecardresearch

‘या’ भाजपा आमदाराला दोन वर्षे शिक्षा होऊनही सदस्यता रद्द झाली नव्हती

भाजपाच्या एका माजी आमदाराला दोन वर्षांची शिक्षा होवूनदेखील त्यांनी त्यांची दुसरी टर्म पूर्ण केली होती.

MLA Sudhir Parve
'या' भाजपा आमदाराला दोन वर्षे शिक्षा होऊनही सदस्यता रद्द झाली नव्हती (image credit – Sudhir Parwe/facebook/loksatta graphics)

नागपूर : मोदी आडनावाबद्दलच्या मानहानी प्रकरणात काल सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आज लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी रद्द केली. मात्र, भाजपाचे माजी आमदार सुधीर पारवे यांना दोन वर्षांची शिक्षा होवूनदेखील त्यांनी त्यांची दुसरी टर्म पूर्ण केली होती.

उमरेडचे भाजपा आमदार सुधीर पारवे यांना एका फौजदारी प्रकरणात भिवापूर प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्याने ते विधानसभा सदस्य म्हणून अपात्र ठरले होते. मात्र, अपात्रतेचा आदेश कोणी काढावा, यावरून विधिमंडळ सचिवालय आणि राज्यपाल कार्यालय यांच्यात एकमत होत नसल्याने पारवे यांचे फावले होते. आमदारकी वाचविण्यासाठी हा वाद निर्माण केला जात असल्याचा संशय त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता.

हेही वाचा – वर्धा: यापूर्वीही विधानसभेत दारूबंदी चर्चेत, पण गांधीवादीनी घेतला असा पवित्रा…

हेही वाचा – भंडारा: सोन्याचे दागिने चमकविण्याच्या बहाण्याने घरी आले आणि….

सुधीर पारवे उमरेड मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. २००५ मध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना एका शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक (भिवापूर) न्यायालयाने त्यांना २४ एप्रिल २०१५ ला दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधी आपोआप अपात्र ठरतो. त्यानुसार पारवे यांचे विधानसभा सदस्यत्व तातडीने रद्द होणे आवश्यक होते. पारवे यांच्या प्रकरणात मात्र चालढकल करण्यात आली आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळ पूर्ण केला होता.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 17:13 IST

संबंधित बातम्या