काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह ‘भारत जोडो’ पदयात्रेनिमित्त शेगाव येथे दाखल झाले.बुधवारी, १६ नोव्हेंबरला संतनगरीत दाखल झाल्यावर दिग्विजय सिंह यांचे काँग्रेसच्या जिल्हा संपर्क मंत्री आमदार यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे, किरणबापू देशमुख, रामविजय बुरुंगले यांनी स्वागत केले.

हेही वाचा >>>गोंदिया- कोहमारा मार्गावर ट्रक-प्रवासी वाहनाची धडक; तिघांचा मृत्य

Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election 2024
विजय शिवतारे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना शब्द; म्हणाले, “बारामतीच्या विजयामध्ये पुरंदरचा सिंहाचा वाटा असेल”
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
narayan rane
शिंदेंची रत्नागिरीत ताकद नाही; राणेंचा दावा
Former District Congress President Prakash Devtale joins BJP
जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

या ज्येष्ठ नेत्याने जिल्ह्यातील भारत जोडो पदयात्रा व खासदार राहुल गांधी यांच्या जाहीर सभेच्या नियोजनाची माहिती घेतली. त्यांनी संत गजानन महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यानंतर आनंदसागर नजीक १८ तारखेला संध्याकाळी आयोजित सभेच्या स्थळाची पाहणी केली. तसेच उपलब्ध सुविधा, संभाव्य गर्दी, तयारीचा आढावाही घेतला.