लोकसत्ता टीम

नागपूर : मध्य रेल्वेने कुंभमेळासाठी नागपूर येथून चार गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली गाडी उद्या, बुधवारी नागपूरहून दानापूरकडे निघणार आहे. प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभ मेळ्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान चार विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. नागपूर-दानापूर दरम्यान चार विशेष गाड्या सुरू करण्यात येत आहे.

Indore Nagpur Vande Bharat Express timings schedule update
वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत उद्यापासून बदल…तुम्ही प्रवास करणार असाल तर आधी….
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
zee marathi awards sharmishtha raut
‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकांची निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत! पुरस्कारांचा फोटो शेअर करत म्हणाली, “सलग दुसरं वर्ष…”
minor girl sexualy abused by lover in nagpur
नागपूर : मध्यरात्री अल्पवयीन मुलगी प्रियकराच्या मिठीत; वडिलांनी…
umber gets the blessings of Goddess Lakshmi
Numerology: ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते माता लक्ष्मीची कृपा, कधीही कमी पडत नाही पैसा
terror among the villagers after tiger kills man in melghat
मेळघाटात वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू ; गावकऱ्यांमध्‍ये दहशत
nagpur Deputy Commissioner Rashmita Rao paraded all recorded criminals at Hudkeshwar Police Station
‘रेकॉर्ड’वरील गुन्हेगारांची ‘परेड’
MLA Kiran Lahamte stay at the government ashram school in Akola news
अकोले: आश्रम शाळेत आमदार डॉ.लहामटे यांचा मुक्काम

कुंभमेळा विशेष गाडी नागपूर येथून बुधवारी दुपारी १२ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५० वाजता दानापूर येथे पोहोचेल. कुंभमेळा विशेष गाडी दानापूर येथून ६ फेब्रुवारीला दुपारी २.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४० वाजता नागपूर येथे पोहोचेल. कुंभमेळा विशेष गाडी नागपूर येथून ८ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता दानापूर येथे पोहोचेल. कुंभमेळा विशेष गाडी दानापूर येथून ९ फेब्रुवारीला दुपारी २.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४० वाजता नागपूर येथे पोहोचेल.

ही गाडी गोंदिया, नैनपूर, घोंसोर, कछपुरा, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्जापुर, चुनार, न्यू वेस्ट केबिन, पं. दिनदयाल उपाध्याय, बक्सर आणि आरा येथे थांबणार आहे. या गाडीला दोन प्रथम श्रेणी वातानुकूलित, एक द्वितीय श्रेणी वातानुकूलित, दोन द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी वातानुकूलित संयुक्त कोच , नऊ वातानुकूलित चेअर कार, जनरल चेअर कार, दोन गार्ड व्हॅन असे एकूण २० डबे राहणार आहेत.

प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येमुळे करोडो भाविकांची गर्दी जमली होती. यादरम्यान मध्यरात्री १ वाजता (२९ जानेवारी) रोजी संगम किनाऱ्यावर अमृतस्नानापूर्वी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली.

कुंभमेळ्याच्या ‘शाही स्नाना’साठी प्रयागच्या त्रिवेणी संगमावर हजारो भाविक जमतात. भारताच्या उत्तर भागातच, प्रमुख चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावरील ‘गोदावरी’ नदी, जी गंगा नदी नंतर भारतातील सगळ्यात मोठी नदी आहे! ही जर सीमारेषा मानली तर, तिच्या पलीकडील उत्तरेकडील भागात प्रामुख्याने ‘कुंभमेळा’ भरतो. गेल्या दशकभरात, भारतात माहिती-तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असताना… ‘व्हॅाटस्ॲप’, ‘इन्स्टाग्राम’, ‘फेसबुक’, ‘एक्स’ (पूर्वीचे ‘ट्विटर’) या समाज माध्यमांचा वापर वाढला आहे. त्यामुळे हातातील ‘स्मार्टफोन’ मध्ये दिवसातील कोणत्याही वेळी सतत माहिती, चलचित्रे यांचा लोंढा येऊन आदळत असतो.

Story img Loader