बुलढाणा : बारावी परीक्षेसाठी दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत काटेकोरपणे राबविण्यात आलेले कॉपी मुक्त अभियान पहिल्याच दिवशी फसले. बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरला चौघा परीक्षार्थींना कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आले. दुसरीकडे, तब्बल सव्वासातशे विद्यार्थ्यांनी कठीण समजला जाणारा इंग्रजीचा पेपर देण्याचे टाळले.

जिल्ह्यात कॉपी मुक्त अभियानाच्या कडक अंमलबजावणीसाठी सुसज्ज नियोजन करण्यात आले होते. मात्र, आज पहिल्याच दिवशी अभियानाला धक्का बसला. आज सकाळी ११ ते दुपारी २ वाजतादरम्यान पार पडलेल्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये नक्कल करताना चौघा परीक्षार्थींना पकडण्यात आले. यामध्ये मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील केंद्रावर तिघांना तर मोताळ्यातील एकाचा समावेश आहे. मलकापूरचे तहसीलदार राजू सुरडकर यांनी ही कारवाई केली.

haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा
10th students will get extra marks What is the reason
दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार? काय आहे कारण? वाचा…

हेही वाचा – बुलढाणा: शेतकऱ्यांवरील लाठीमार षडयंत्रच ! मला संपविण्याची सुपारी देण्यात आली; रविकांत तुपकर यांचा गंभीर आरोप

हेही वाचा – नागपूर : पत्नीच्या मैत्रिणीला संदेश पाठवून पतीने संपवले जीवन

दरम्यान, आजच्या पेपरसाठी ११३ केंद्रावरून ३२ हजार ६९५ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी तब्बल ७२२ जणांनी पेपरच देण्याचे टाळले. ३१ हजार ९७३ जणांनी हजेरी लावली.