शहरातील कोट्यधीश असलेल्या काही व्यावसायिकांना तोतया समाज माध्यम विश्लेषक अजित पारसे याने सक्तवसुली संचालनालय (ईडी) विभागाचा अधिकारी असल्याचे सांगून फोन केले. त्यांना ‘ईडी’च्या बनावट नोटिस दाखवून कोटींची खंडणी वसूल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजितने कोट्यवधींचे भूखंड खरेदी केले असून आपल्या कुटुंबियांच्या नावे मोठी गुंतवणूक केली आहे.पारसेने राज्यातील काही बड्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना समाज माध्यमाद्वारे प्रसिद्धी आणि प्रचार करून देण्यासाठी कोट्यवधी घेतले. नागपुरातील मोठे राजकीय नेते आणि त्यांच्या पत्नींसोबत फोटो काढून फेसबुक आणि ट्वीटरवर टाकून अजितने प्रभाव पाडला होता. अगदी काही दिवसांत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अजितने शहरातील मोठ्या व्यावसायिकांना ‘ईडी’ अधिकाऱ्यांच्या नावाने फोन करून कारवाई करण्याची धमकी दिली होती. ‘ईडी’ची कारवाई रोखण्यासाठी अजितने अशा काही व्यावसायिकांकडून मोठी रक्कम उकळली आहे. तसेच काही व्यावसायिकांना ‘सीबीआय’चा धाक दाखवून खंडणी उकळली. अजितने फसवणुकीत अपंग व्यावसायिकालाही सोडले नाही. त्याला पंतप्रधान कार्यालयातून ३० कोटींचा निधी मिळवून देण्याच्या नावाखाली ३ कोटींनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा >>>नागपूर : तरुणांमध्येही मणके विकाराचे प्रमाण वाढले ; जागतिक स्पाईन दिवस आज

High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

राजकीय व्यक्तींचा वरदहस्त असल्यामुळे पारसेची हिम्मत वाढली. त्याने चक्क काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरले. काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हातून स्वत:चा सत्कार करवून घेतला. एका ज्योतिष्यालाही ४० लाखांनी चुना लावला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करताच त्याने रुग्णालयात दाखल होण्याचे नाटक केले. मात्र, तेथे दोन दिवस ठेवल्यानंतर डॉक्टरांनी त्याला घरी पाठवले. अजित पारसेेने उपचार घेत असलेल्या रुग्णालयाच्या इमारतीच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, परिचारिकांनी सतर्कता दाखविल्यामुळे तो थोडक्यात बचावला. रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर अजितने घरात काचाची बाटली फोडून दोन्ही हाताच्या नसा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या वारंवार आत्महत्या करण्याच्या प्रयत्नामुळेच पोलीस त्याला अटक करत नसतील, अशी चर्चा आहे.

हेही वाचा >>>नागपूर : फुटाळ्यातील ‘म्यु्झिकल फाउंटन शो’ आजपासून

अजित पारसेकडून आठ महागडे मोबाईल पोलिसांनी जप्त केले. त्याच्या मोबाईलमध्ये शहरातील अनेक विवाहित महिला-तरुणी, जिमच्या संचालिका, ब्युटी पार्लरच्या संचालिका, काही प्राध्यापिका आणि महिला डॉक्टरांशी अश्लील चँटिंग केली आहे. एकमेकांना अश्लील छायाचित्र पाठविले आहेत. प्रेमात पडलेल्या काही विवाहित महिलांकडून पैसेही घेतल्याचेही स्क्रिनशॉट पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पारसेने लोकांकडून लुबाडलेल्या कोट्यवधी रुपयांतून कुटुंबियांच्या नावावर बरीच मोठी गुंतवणूक केली. त्याने आपल्या कुटुंबियांच्या नावावर सुपर बाजार उघडला. तसेच कुटुंबियांच्या नावावर शेअर्स मार्केटमध्ये कोट्यवधी गुंतवले. एका अलिशान हॉटेलमध्ये भागीदारी ठेवली असून एका व्यावसायिकाकडून बिअरबारही विकत घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू केला. तसेच तो शहरात कारचे नवे शोरुम टाकण्याच्या तयारीत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>> नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करा ; प्रशांत पवार, गुंठेवारीचे नियमितीकरण ही अधिकाऱ्यांची भ्रष्टाचाराची योजना

पारसेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी छापा घातला. त्यावेळी अजित दारुच्या नशेत होता. घराची झाडाझडती सुरु असताना त्याने एका धारदार चाकू खिशात ठेवला. नेमो त्यावेळी एका सतर्क पोलीस अधिकाऱ्याला संशय आला. त्या अधिकाऱ्याने अन्य कर्मचाऱ्यांना त्याला घेरण्याचे आदेश दिले. त्यावेळी त्याच्या अंगझडतीत चाकू सापडला. तो पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता, अशी चर्चा आहे.