नागपूर : धंतोलीतील कोलंबिया रुग्णालयात औषधालय टाकण्याच्या नावावर आरोपी विकास श्यामसुंदर बोरा (४५, नरेंद्रनगर) याने एका यवतमाळच्या डॉक्टरची दीड कोटी रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी विकास बोरावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. संजू लखनलाल जोशी (५८, यवतमाळ) यांची मित्र सुनील गुलालकारी यांनी आरोपी विकास श्यामसुंदर बोरा (४५, नरेंद्रनगर) याच्याशी जून २०२० मध्ये ओळख करून दिली. बोरा यांनी सांगितले की, डॉ. प्रवीण गंटावार आणि शरद लुटे हे धंतोलीतील कोलंबिया हॉस्पिटलमध्ये औषधालय उघडणार आहेत. ते औषधालयाची विक्री करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे डॉ. संजू जोशी यांनी स्वत:च्या मुलाला औषधालय टाकण्याच्या उद्देशाने सौदा करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >>> नागपूर : विमा रुग्णालयातील ७६ कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात?

विकास बोरा यांनी डॉ. गंटावार यांच्याशी करार झाल्याचे सांगितले. औषधालय देण्याच्या नावाखाली डॉ. जोशी यांच्याकडून ५ डिसेंबर २०२२ पर्यंत तब्बल १ कोटी ५० लाख रुपये विकास बोरा याने घेतले. महिन्याला ३ लाख रुपये देण्याचा करार केला. मात्र, प्रत्यक्षात फसवणूक करण्यासाठीच औषधालयाबाबत चुकीची माहिती देणाऱ्या विकास बोरा याचे बिंग फुटले. त्यामुळे विकास बोराने ३८ लाख ८० हजार रुपये परत केले. मात्र, उर्वरित रक्कम न देता फसवणूक केली. त्यामुळे धंतोली पोलिसांनी बोराविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of one and a half crores in the name of medicine adk 83 ysh
First published on: 02-02-2023 at 09:44 IST