scorecardresearch

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) नोकरी लावून देण्याचे  आमिष दाखवून बेरोजगारांना लुटणारी टोळी सक्रिय झाली असून एका बेरोजगार युवकाला साडेपाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

मेडिकलमध्ये टोळी सक्रिय

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) नोकरी लावून देण्याचे  आमिष दाखवून बेरोजगारांना लुटणारी टोळी सक्रिय झाली असून एका बेरोजगार युवकाला साडेपाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

संजय अकोटकर आणि नीलेश नानवटकर अशी टोळीतील आरोपींची नावे आहेत.  प्राप्त माहितीनुसार, संतोष दियेवार (४०, रा. त्रिमूर्तीनगर) यांच्या मित्राच्या माध्यमातून आरोपी नीलेश आणि संजयशी त्यांची ओळख झाली. आरोपींनी आपली मेडिकलमध्ये मोठय़ा अधिकाऱ्यांशी ओळख असून लिपिक पदावर नोकरी लावून देऊ शकतो, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून संतोषने आपल्या दोन भाच्यांना नोकरीची गरज असल्याचे सांगितले. आरोपींनी दोघांनाही नोकरी लाऊन देण्यासाठी पैशांची मागणी केली. संतोष यांनी आरोपींना ५ लाख ५० हजार रुपये दिले. पैसे देऊन बराच कालावधी लोटला मात्र नोकरीच्या कोणत्याही हालचाली संतोष यांना दिसून आल्या नाही. त्यांनी आरोपींशी संपर्क साधल्यानंतर ते संतोष यांना टाळू लागले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fraud showing job lure gang active in medical ysh

ताज्या बातम्या