बुलढाणा: होय! ही बातमी सावध करणारीच आहे. गुंतविलेल्या पैशाचे अल्पावधीतच दामदुप्पट, तिप्पट करण्याच्या आमिषाने शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा आपला बेत असेल तर ही बातमी तुमचे आर्थिक नुकसान होण्यापासून वाचवू शकते. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एका व्यापाराला हा मोह भलताच महागात म्हणजे चोवीस लाखात पडला आहे.

शेअर बाजारात घसरणीमुळे होणारे नुकसान तुलनेने कमी आणि एकवेळ क्षम्य आहे. मात्र गुंतवणुकीच्या नावाखाली काही ऑनलाईन ठगसेन अनेकाना गंडवतात . बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एका बड्या व्यापाराला अशाच ठगांनी तब्बल २४ लक्ष २७ हजार रुपयांचा गंडा घातलाय! सायबर पोलिसांनी तपास अंती पुणे येथून एकाला ताब्यात घेतले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

आणखी वाचा-नागपूर : महात्मा फुले योजनेचा लाभ केवळ ४३ टक्के रुग्णांनाच! कारणे व लाभ जाणून घ्या…

फसवणुकीचा आधुनिक फंडा

या घटनाक्रमात मागील मार्च २०२४ मध्ये या व्यापाऱ्याला गंडविण्यात आले होते.शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून मलकापूर येथील व्यापाऱ्याची २४ लाखांची ऑनलाइन फसवणूक केली. व्यापाऱ्याने बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

प्रकरणी भादवी कलम ४०६, ४१ ,४१९, ४२०,४६८ आयपीसी आर डब्ल्यू ६६ सीडीआयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला . या रॅकेट मधील एक आरोपी गणेश खैरे याला बुलढाणा सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तो फिर्यादी व्यापाऱ्याच्या ‘व्हाट्सअप वर शेअर मार्केट ऑफलाइन ट्रेडिंग’ संबंधित संदेश पाठवीत होता. तिप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने व्यापाऱ्याकडून वेगवेगळ्या अकाउंट वरून पैसे मागवले. सायबर पोलिसांनी गुन्ह्यांशी संबधीत सर्व बँक खात्याचे तपशील, मोबाईल क्रमांक यांची पडताळणी केली.

आणखी वाचा-अमरावतीत हत्‍यासत्र थांबेना, अल्‍पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्‍या

फसवणुक करण्या करीता ‘फ्रॉडस्टर’ला विवीध लोकांचे बँक खाते, त्याचा तपशील आरोपी गणेश नारायण खैरे (वय ३२ वर्षे, राहणार खैरे नगर ,पुणे) हा पुरवित होता. ग्रामीण शिरुर पोलीस स्टेशन हददीतील त्याचे रहाते घरुन खैरे याला ताब्यात घेण्यात आले.प्रकरणाचा तपास पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी ,सायबर ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचे नेतृत्वात तपास करण्यात येत आहे. कुणाल चव्हाण, शकील खान, राजदीप वानखडे, विक्की खरात, संदीप राऊत यांचा तपास पथकात समावेश आहे.