नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष, भीती दाखवून जबरीने गुंतवणुकीस भाग पाडून फसवणूक करणाऱ्या टोळीस प्रतापनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अनुराग जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फिर्यादी साहिल विनोदसिंह चव्हाण (रा. बन्सीनगर) याने इन्स्टाग्रामवर विक्रांत एक्स्चेंज या होम पेजवर ‘गुंतवलेल्या रकमेवर तीन दिवसांत तीन टक्के व्याजदराने परतावा मिळेल’ अशी जाहिरात बघितली. त्याने स्वतः व मित्र शुभम काळबांडे यांनी रोख व ऑनलाइन रक्कम गुंतवली. ती परत मागितली असता विक्रांत एक्स्चेंज नावाने बोलणाऱ्याने ‘तुम फिरसे पैसा डालो. नही डालोगे तो तुम्हारे पुरे पैसे डुब जायेंगे’ अशी भीती दाखवल्याची तक्रार आल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

हेही वाचा – VIDEO: काळा बिबट, पांढरे हरीण, गुणकारी पिवळ्या पळसपाठोपाठ बिबट्याची काळी पिल्ले चर्चेत; ताडोबातील चित्रफीत सार्वत्रिक

हेही वाचा – ‘अ‍ॅप आधारित टॅक्सी’ चालकांवर नियमबदलाचा भुर्दंड, ‘चाईल्ड लॉक’ काढल्याशिवाय परवाना नूतनीकरण नाही; ‘पॅनिक बटन’ची सक्ती

विक्रांत एक्स्चेंज नावाने असलेल्या कंपनीच्या फोन कॉल्सवरून सांगितेलेले अकाउंट व इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. गायत्रीनगरातील एका फ्लॅटवर काहीजण एका उपकरणावर रक्कम मोजत होते. तेथे आरोपी अर्जुन चंदूभा राठोड व धर्मेंद्र अकोबा वाला, नीलेशकुमार मनुप्रसाद दवे, विष्णुभाई क्रिष्णादास पटेल (रा. क्वेटा कॉलनी वर्धमाननगर), विरमसिंह जयवंतसिंह राठोड (रा. सिमर ता. उना, जि. सोमनाथ), विक्रमसिंह धनाजी वाघेला, जोरुबा जेलुसी वाघेला (रा. वसाई, ता. चाणसमा, जि. पाटण) या आरोपींना पकडण्यात आले. तेथून ५८ लाख ३६ हजार ५२५ रुपये, रक्कम मोजण्याची २ उपकरणे, ६ मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. हे सर्व आरोपी गुजरातचे आहेत.