पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे मोफत रेबिज प्रतिबंधक लसीकरण शिबीर

शिबिरात एकूण ६७ श्वानांना रेबिज प्रतिबंधक लस देण्यात आली. रेबिज व इतर घातक रोगांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

जागतिक रेबिज दिनानिमित्त आयोजन

नागपूर : नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या उत्तर अंबाझरी मागरावरील पशुचिकित्सालयात जागतिक रेबिज दिनानिमित्त श्वानांमध्ये मोफत रेबिज प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ६७ श्वानांना रेबिज प्रतिबंधक लस देण्यात आली. रेबिज व इतर घातक रोगांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

रेबिज हा पिसाळलेल्या श्वानांच्या चावल्यामुळे मनुष्यास होणारा प्राणघातक आजार असून जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी जवळपास २० हजार मृत्यू रेबिजमुळे होतात. अशा प्राणघातक आजाराच्या प्रतिबंधासाठी श्वानांमध्ये रेबिज प्रतिबंधक लसीकरण हाच एक प्रभावी उपाय आहे.

या मोफत लसीकरण शिबिराचे उद्घाटन नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोग अधिष्ठाता डॉ. ए.पी. सोमकुंवर यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात लसीकरण व मार्गदर्शन करण्याकरिता पशुचिकित्सालयाचे प्रमुख डॉ. संदीप आखरे, डॉ. विनोद धुत, डॉ. दिलीप रघुवंशी, डॉ. गौतम भोजने, डॉ. चेतक पंचभाई, डॉ. गौरी खंते, डॉ. भाग्यश्री भदाने, डॉ. फरहीन फनी आणि डॉ. मीनाक्षी बावस्कर यांनी परिश्रम घेतले. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Free rabies prevention vaccination camp veterinary college ssh

ताज्या बातम्या