scorecardresearch

Premium

चंद्रपूर : १ ऑक्टोबरपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्ण, नातेवाईकास मिळणार पास, गर्दी टाळण्यासाठी…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय), चंद्रपूर येथे रुग्ण दाखल होताना रुग्णासोबत बरेच नातेवाईक रुग्णालयात गर्दी करतात. त्यामुळे वारंवार सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो.

District General Hospital Chandrapur pass
चंद्रपूर : १ ऑक्टोबरपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्ण, नातेवाईकास मिळणार पास, गर्दी टाळण्यासाठी… (प्रातिनिधिक छायाचित्र)

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय), चंद्रपूर येथे रुग्ण दाखल होताना रुग्णासोबत बरेच नातेवाईक रुग्णालयात गर्दी करतात. त्यामुळे वारंवार सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यादृष्टीने १ ऑक्टोबर २०२३ पासून रुग्णालयात रुग्णास दाखल करताना संबंधित रुग्ण व रुग्णाच्या एका नातेवाईकास पास वितरित करण्यात येणार आहे.

हेही वाचा – “पक्ष नेतृत्वाचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा,” चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत मुनगंटीवार काय म्हणाले? वाचा…

chandrapur dengue and typhoid patients, 23 year old girl dies due to dengue, hospitals crowded with patients of dengue and typhoid
डेंग्यूने २३ वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ; सार्वजनिक व खासगी रुग्णालयांत डेंग्यू व टायफाईड रुग्णांची गर्दी
government medical colleges and hospitals chadrapur
चंद्रपूर : खाटा कमी, रुग्णसंख्या अधिक!
nagpur hospital, heavy rainfall in nagpur, heavy rain in nagpur, patients shifted to other hospitals in nagpur
नागपूर : केअर रुग्णालयातील ७० रुग्ण इतरत्र हलवले; पावसाचा तडाखा, धावाधाव
Gadchiroli District Hospital
प्रवेश पंचतारांकित, आत कोंडवाडा! गडचिरोली जिल्हा रुग्णालय अस्वच्छता आणि गैरसोयीमुळे आजारी

हेही वाचा – मोबाईल ठरतोय कुटुंबातील खलनायक! न्यायालयात दाखल दाव्यापैकी ४० टक्के घटस्फोटाचे कारण मोबाईल

या पासच्या आधारे रुग्णांच्या नातेवाईकास रुग्णालयामध्ये प्रवेश दिला जाईल. तसेच रुग्णास भेटण्याची व रुग्णासोबत थांबण्याची परवानगीदेखील देण्यात येणार आहे. विनाकारण रुग्णालयामध्ये गर्दी होऊ नये, याकरीता नागरिकांनी रुग्णालय प्रशासन, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: From october 1 patients admitted to the district general hospital in chandrapur and their relatives will get a pass rsj 74 ssb

First published on: 30-09-2023 at 15:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×