उन्हाळ्यात बडदास्त, कुलरचीही सोय; नागपुरात तापमान ४३ अंश सेल्सिअसवर

बर्फापासून तयार केलेला ‘फ्रुट केक’, कुलरची थंडगार हवा आणि पाण्याचे शिंपडण केल्यामुळे होणारी आंघोळ अशी खास बडदास्त महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांसाठी करण्यात आली आहे. प्रशासनाने नेहमीप्रमाणे प्राण्यांसाठी कुलर आणि पाण्याची शिंपडण करून गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरीही ‘फ्रूट केक’ची मेजवानी माकडांना, अस्वलांना आणि पक्ष्यांना यंदा मिळाली आहे. उन्हाच्या झळांमुळे वाघापासून तर पोपटापर्यंत कुणालाही त्रास होऊ नये, यासाठी ही प्रशासनाकडून काळजी घेण्यात आली आहे.

Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

माणसाप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही उकाडय़ाचा प्रचंड त्रास होतो, प्राणिसंग्रहालयातील खंदक आणि पिंजऱ्यात राहणारे वन्यप्राणीही त्याला अपवाद नाहीत.उन्हाळ्यात माणसाला जसा उकाडा असह्य़ होतो आणि शरीरावर त्याचे दुष्परिणाम जाणवतात तसेच वन्यप्राणी आणि पक्ष्यांनाही उन्हाचे वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात.

वन्यप्राण्यांना जंगलातील हिरवळ, मातीचा थंडावा आणि पाणवठे यामुळे उकाडय़ासोबत दोन हात करावे लागत नसले तरीही पिंजऱ्यातील वन्यप्राण्यांना लोखंडी पिंजऱ्यांचे चटके सोसावे लागतात. जंगलातील प्राण्यांप्रमाणे त्यांच्या वाटय़ाला हिरवळ येत नाही किंवा पाणवठय़ात तासान्तास बसून शरीराचा दाह कमी करता येत नाही. मात्र, महाराजबाग प्रशासन दरवर्षी प्राणिसंग्रहालयातील या प्राण्यांची उकाडय़ापासून सुटका व्हावी म्हणून नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करते.

नागपुरात आता तापमान ४३ अंश सेल्सिअसवर  गेले आहे. उन्हाच्या झळांचा प्राण्यांना त्रास त्यांना होऊ नये म्हणून कुलरसोबतच पाण्याचे शिंपडणदेखील केले जात आहे. मात्र, ‘फ्रूट केक’च्या मेजवानीने प्राणिसंग्रहालयातील प्राणी जरा जास्तच आनंदले आहेत.

फ्रूट केक

कुलर, पाण्याचे फवारे, हिरवी जाळी या व्यवस्था नेहमीप्रमाणेच करण्यात आल्या आहेत, पण यावर्षी ‘फ्रूट केक’ ही नवी संकल्पना माकडं, अस्वल आणि पक्ष्यांसाठी खास राबवली जात आहे. बर्फ तयार होत असतानाच त्यात अस्वलांना, माकडांना आवडणारी फळे ठेवली जातात. बर्फाच्या आत ही फळे पूर्णपणे बसल्यानंतर ती अस्वल, माकड आणि पक्ष्यांना खाऊ घातली जात आहेत. बर्फातून कल्पकतेने फळे बाहेर काढून ते खातात. थंडगार फळे खायला मिळाल्याने त्यांच्या पोटाचा दाहही शांत होतो आणि मग कुलरच्या हवेत आणि मधूनमधून होणाऱ्या पाण्याचे शिंपडण यामुळे गारवाही त्यांना अनुभवायला मिळतो, असे महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांनी सांगितले.