future of junior colleges dark in maharashtra 1 lakh 81 thousand seats are vacant for eleventh zws 70 | Loksatta

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात ; अकरावीच्या १ लाख ८१ हजारांवर जागा रिक्त

सध्या शिकवणी वर्गाचे लोण सर्वत्र पसरले असून अकरावीचा प्रवेश हा नाममात्र राहिला आहे.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात ; अकरावीच्या १ लाख ८१ हजारांवर जागा रिक्त
प्रतिनिधिक छायाचित्र

देवेश गोंडाणे, लोकसत्ता 

नागपूर : राज्यात शहरी भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे यंदा १ लाख ८१ हजार जागा रिक्त असल्याने कनिष्ठ महाविद्यालयांचे भविष्य धोक्यात आहे. अकरावी प्रवेशासाठी सुरू असलेल्या विशेष फेरीनंतर मुंबईमध्ये १ लाख ९ हजार, पुण्यात ३६ हजार तर नागपुरात २१ हजार व अन्य शहरांतील जागा पकडून राज्यातील एकूण १ लाख ८१ हजारांवर जागा रिक्त आहेत.

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती या शहरांतील महापालिका क्षेत्रात अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. मात्र, दोषपूर्ण प्रक्रियेमुळे तिला मोठय़ा प्रमाणात विरोध होत आहे. इंग्रजी शाळांचे वाढते वलय लक्षात घेता मराठी माध्यमांच्या शाळांना आता घरघर लागली असून प्राथमिक आणि माध्यमिकच्या शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. यामुळे दरवर्षी शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरत असून समायोजनाची डोकेदुखी वाढली आहे. यात आता कनिष्ठ महाविद्यालयांचाही समावेश होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

हा संभाव्य धोका ओळखूनच अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी स्वयंअर्थसाहाय्यित तत्त्वावर प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मागील काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा ओढा ‘सीबीएसई’ शिक्षणाकडे आहे. त्याचा फटका कनिष्ठ महाविद्यालयांना बसत आहे. मागील दोन वर्षांतील राज्यातील अकरावी प्रवेशातील रिक्त जागांशी यंदाची तुलना केल्यास रिक्त जागांचे संकट अधिक गडद झाल्याचे दिसत आहे. दहावीची परीक्षा महाविद्यालय स्तरावर झाल्याने निकालात मोठी वाढ झाली. त्यामुळे खूप प्रवेश होतील अशी अपेक्षाही आता धूसर झाली आहे. अकरावीसाठी यंदा राज्यात एकूण ५ लाख ८२ हजार जागांवर प्रवेश अपेक्षित होते. परंतु सर्व फेऱ्या संपून विशेष फेरी सुरू असताना केवळ ४ लाख ६७५ जागांवर प्रवेश झाले. यामुळे १ लाख ८१ हजारांवर जागा रिक्त आहेत.

शिकवणी वर्गाचे संलग्नीकरण घातक

सध्या शिकवणी वर्गाचे लोण सर्वत्र पसरले असून अकरावीचा प्रवेश हा नाममात्र राहिला आहे. अनेक शिकवणी वर्गाचे महाविद्यालयांशी संलग्नीकरण असते. त्यामुळे विद्यार्थी अशाच महाविद्यालयातील प्रवेशाला प्राधान्य देतात. मात्र, ऑनलाइन प्रवेशामुळे आपल्या शिकवणी वर्गाचे संलग्नीकरण असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाणे कठीण जाते. त्यामुळे शिकवणी वर्गानी आपला मोर्चा शहरालगतच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयांकडे वळवला आहे. परिणामी, शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ही धोक्याची घंटा ठरत असून येथील शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

रिक्त जागा

शहर         प्रवेश क्षमता    प्रवेश निश्चिती   रिक्त जागा

मुंबई         ३,७१,७९५       २,६२,३७०       १,०९४२५

पुणे          १,११,७५०       ७५,३८४       ३६,३६६

नागपूर        ५५,८००       ३४,०९१       २१,७०९

नाशिक        २६,४८०       १८,४२६       ८,०५४

अमरावती    १६,१९०     १०,४०४       ५,७८६

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
संकटग्रस्त यादीतील पानटिलवा मुंबईत दाखल ; वेळेपूर्वीच स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन

संबंधित बातम्या

“हे फक्त गडकरीच करू शकतात, तो काँग्रेसचा नेता असूनही…”, नाना पाटेकरांचं नागपुरात वक्तव्य
चंद्रपूर: ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वि. स. जोग यांची निवड
दुर्दैवी ! ताडोबात वाघांच्या चार बछड्यांचा मृत्यू; मोठ्या वाघाने केला हल्ला की…
अकोला येथील जमावाचा शेगावात धुडगूस ; संजय मुरारका मृत्यू प्रकरणाचे उमटले तीव्र पडसाद
भंडारा : लग्न समारंभात अन्नातून २०० जणांना विषबाधा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
लग्नाच्या १८ वर्षानंतर कलाकार दाम्पत्य झाले आई-बाबा; व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
लोकलमध्ये जागा न मिळाल्याने महिलेने थांबवली ट्रेन; अन् त्यानंतर जे झालं…’ पाहा हा व्हिडीओ
‘संस्काराच्या शिदोरीतील उत्तम गुणदर्शन’! पाकिस्तानच्या रावलपिंडी मैदानात जो रूटने असं काही केलं…; Video होतोय तुफान Viral
VIDEO: चेंडू चमकवण्यासाठी जो रुटने लढवली अजब शक्कल; चक्क! ‘जॅक लीचच्या…’
“संजय राऊतांना पिसाळलेल्या कुत्रा चावला आहे,” शिंदे गटातील आमदाराची सडकून टीका