scorecardresearch

दुर्दैवी! वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; मृत बछडे ‘टी-६’ वाघिणीचे असल्याचा अंदाज

गडचिरोली वनविभागांतर्गत कक्ष क्रमांक ४१५ पी मधील अमिर्झा बिटात वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.

दुर्दैवी! वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; मृत बछडे ‘टी-६’ वाघिणीचे असल्याचा अंदाज
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

गडचिरोली : गडचिरोली वनविभागांतर्गत कक्ष क्रमांक ४१५ पी मधील अमिर्झा बिटात वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. सध्या पोर्ला आणि चातगाव वनपरिक्षेत्रात ‘टी-६’ वाघिणीचा वावर आहे. महिनाभरापूर्वी ती आपल्या चार बछड्यांसह वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात आढळून आली होती. त्यामुळे मृत बछडे ‘टी-६’ वाघिणीचेच असल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> बंजारा समाजाला सनातन धर्माशी जोडण्याचे भाजप, संघाचे षडयंत्र; देवानंद पवार यांचा गंभीर आरोप

३ जानेवारीला एका बछड्याचे अवशेष आढळून आले होते. तेथून दोनशे मीटर अंतरावर ६ तारखेला आणखी एका बछड्याचे अवशेष दिसून आले. दोन्ही अवशेष हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पोर्ला आणि चातगाव वनपरिक्षेत्राच्या सीमावर्ती भागात ‘टी-६’ वाघिणीसह आणखी पाच वाघांचा वावर आहे. त्यामुळे वाघाच्या हल्ल्यात दोन्ही बछडे ठार झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढल्याची माहिती गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलीशकुमार शर्मा यांनी दिली. ‘टी-६’ वाघिणीने आतापर्यंत १० हून अधिक जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे ३० डिसेंबरला वरिष्ठांकडून परवानगी मिळाल्यानंतर या वाघिणीला पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी आणि अन्य तज्ज्ञांची चमू चार-पाच दिवसांपासून परिश्रम घेत आहे. अशातच दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 20:10 IST

संबंधित बातम्या