scorecardresearch

गडचिरोली : जहाल महिला नक्षलवादीला अटक; एटापल्ली पोलिसांची कामगिरी

नक्षलवाद्यांनी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह पुकारला होता

naxal
(संग्रहीत छायाचित्र)

नाकाबंदी करून जहाल महिला नक्षलवादी मुडे हिडमा मडावीला अटक करण्यात एटापल्ली पोलिसांना यश आले आहे. दंडकारण्यात नक्षलवाद्यांनी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह पुकारला होता. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली होती.

एटापल्ली येथे ४ ऑगस्ट रोजी एका महिलेची कसून चौकशी केली असता तिच्याकडे आक्षेपार्ह साहित्य मिळून आले. ती नक्षलवादी असल्याचे समोर येताच तिला अटक करण्यात आली. कसनसूर दलम मध्ये ती सक्रिय होती.

दरम्यान, नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक गोयल यांनी केले आहे.

नक्षलवादी सामान्य आदिवासींची हत्या करून भीती व दशहत पसरवण्याचे काम करीत असतानाच १२ लाखाचे बक्षीस असलेल्या माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी (३४) व भामरागड एरीया टेक्नीकल दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम (६३) या दोन जहाल नक्षलवाद्यांनी मे महिन्यात पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केले होते. टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाची ही यशस्वी कामगिरी मानली गेली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-08-2022 at 10:25 IST