scorecardresearch

गडचिरोली पोलिसांनी घेतला ४० लाखांच्या तीनशे मोबाईलचा शोध, नागरिकांनी मानले आभार

गडचिरोली पोलिसांनी मागील दोन वर्षांत ‘स्मार्ट’ शोध घेत तब्बल ४० लाख किमतीचे जवळपास तीनशे मोबाईल नागरिकांना परत केले.

Gadchiroli police searched mobile phones
गडचिरोली पोलिसांनी घेतला ४० लाखांच्या तीनशे मोबाईलचा शोध, नागरिकांनी मानले आभार (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

गडचिरोली : गेल्या दशकभरात माणसाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक बनलेल्या ‘मोबाईल’ चोरीचे व हरविल्याच्या दररोज देशभरात लाखो तक्रारी येतात. अनेकदा चोरी गेलेला मोबाईल सापडतदेखील नाही. मात्र, गडचिरोली पोलिसांनी मागील दोन वर्षांत ‘स्मार्ट’ शोध घेत तब्बल ४० लाख किमतीचे जवळपास तीनशे मोबाईल नागरिकांना परत केले. त्यामुळे मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी गडचिरोली पोलिसांचे आभार मानले आहे.

सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात यावर्षी शोधण्यात आलेले मोबाईल संबंधित नागरिकाला प्रदान करण्यात आले. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता, यातिश देशमुख, सायबर पोलीस प्रभारी उल्हास भुसारी, पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत हरवलेले मोबाईल संबंधिताला परत करण्याचा एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आलेल्या ६४ व्यक्तींना मोबाईल परत करण्यात आले.

Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र
World Cup 2023 Updates
World Cup 2023: सूर्याला विश्वचषकाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी पाहावी लागेल वाट, सुनील गावसकरांनी सांगितले कारण
thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन

हेही वाचा – रजत नगरीत खामगाव महोत्सवाचे आयोजन, इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाने प्रारंभ

हेही वाचा – नागपूर : ट्रकची दुचाकीला भीषण धडक; १४ महिन्यांच्या बाळाचा चिरडून मृत्यू, आई व मावशी जखमी

हरवलेले मोबाईल सापडल्याने संबंधितांनी आनंद व्यक्त करीत गडचिरोली पोलिसांचे आभार मानले आहे. हरवलेले किंवा चोरी गेलेले मोबाईल शोधण्यात मागील दोन वर्षांत गडचिरोली पोलिसांचा आलेख वाढता असून २०२२ मध्ये २२ लाख किमतीचे १५० तर २०२३ मध्ये आत्तापर्यंत १८ लाख किमतीचे १३५ मोबाईल शोधण्यात त्यांना यश आले आहे. त्यामुळे एकदा हरवलेला मोबाईल सापडत नाही, ही भावना मनातून काढून टाकत तत्काळ तक्रार केल्यास मोबाईल परत मिळू शकतो, असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी यावेळी सांगितले. सोबतच सायबर गुन्हेगारांपासून जनतेने सावध राहावे असेही आवाहन केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gadchiroli police searched 300 mobile phones worth 40 lakhs ssp 89 ssb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×