गडचिरोली : महाराष्ट्रासह ओडिशात माओवाद्यांच्या हिंसक चळवळीत काम करणाऱ्या दाम्पत्याने गडचिरोली पोलिसांपुढे आज शरणागती पत्कारली. त्यांच्यावर आठ लाखांचे बक्षीस होते. आंतरराज्य नक्षल दाम्पत्याच्या शरणागतीमुळे विविध हिंसक कारवाईंचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

असिन राजाराम कुमार ऊर्फ अनिल ऊर्फ गगनदीप ऊर्फ निशांत ऊर्फ सुशांत (३७,रा. मंडीकला ता. नरवाना जि. जिंद, हरियाणा) व अंजू सुळ्या जाळे उर्फ सोनिया उर्फ जनिता (२८,रा. गुरेकसा ता. धानोरा जि. गडचिरोली) असे या दाम्पत्याचे नाव आहे. असिन हा ओडिसात नक्षल चळवळीच्या प्रेस टीममध्ये एरिया कमिटी मेंबर म्हणून काम करायचा तर अंजू ही याच दलममध्ये सदस्य होती. २०१८ पासून ते सुन्नी जि. शिमला (हिमाचल प्रदेश) येथे राहून नक्षल चळवळीसाठी काम करत होती.

Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Anjali Damania
“…तर संतोष देशमुखांचे प्राण वाचले असते”, अंजली दमानिया यांचं पोलीस चार्जशीटमधील महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट
Buldhana, Cinestyle chase, money looted,
बुलढाणा : सिनेस्टाईल पाठलाग, पिस्तूलच्या धाकावर दीड लाख लुटले, तब्बल सहा दरोडेखोरांनी…
bibwewadi police arrest nursing woman for stealing jewellery
शुश्रुषा करणाऱ्या महिलेकडून दागिन्यांची चोरी; महिला अटकेत; साडेआठ लाखांचे दागिने जप्त
youth who attacked builder gets 10 year jail
बांधकाम व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी; न्यायालयाकडून आरोपीला पाच लाखांचा दंड
Varsha Gaikwad MP post, Varsha Gaikwad, court ,
वर्षा गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान, न्यायालयाने निर्णय ठेवला राखून
Baba Siddiqui murder, dominance, Mumbai Police Crime Branch, charge sheet,
वर्चस्व निर्माण करण्यासाठीच सिद्दिकींची हत्या, ४५९० पानांच्या आरोपपत्रात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा दावा

हेही वाचा – दिल्ली-मुंबईच्या मॉडेल तरुणी; नागपूरचे ओयो हॉटेल अन् देहव्यापार…

असिन २००६ मध्ये माड एरीया प्रेस टिममध्ये भरती झाला. २०११ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होता. २०१३ मध्ये त्यांची बदली ओडिशात झाली. २०१८ पर्यंत त्याने तेथे काम केले. त्यानंतर त्याने हिमाचल प्रदेशात आश्रय घेतला. २०१३ मध्ये ओडिशातील उदंती व २०१४ मध्ये ओडसा येथे जंगल परिसरातील चकमकीत त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. अंजू जाळे ही २००७ मध्ये नक्षल चळवळीत आली. टिपागड दलममध्ये कमांडर दिनकर याची मदतनीस म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढे २०१० ते २०१२ या दरम्यान माड एरियातील मौजा घमंडी (छत्तीसगड) गावात जनताना सरकारच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणूनही तिने काम केले. २०१३ पासून २०१८ पर्यंत ओडिसा येथे प्रेस टीममध्ये हिंदी आणि गोंडी भाषेचे टंकलेखक म्हणून तिने काम केले. २०१२ मध्ये लाहेरी व २०१३ मध्ये ओडिशातील उदंती येथील चकमकीत ती सामील होती. महाराष्ट्रातील आत्मसमर्पित योजना चांगली असल्याने तिने गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.

११ लाख मिळणार

असिन कुमार याच्यावर ६ लाख तर अंजू जाळेवर दोन लाखांचे बक्षीस महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते. आत्मसमर्पण योजनेंतर्गत आता या दाम्पत्यास ११ लाख रुपये मिळणार आहेत.

हेही वाचा – मुलाचा खून करुन बाप मृतदेहाजवळच झोपला…

आतापर्यंत २९ नक्षलवाद्यांनी शस्त्र ठेवले

माओवादविरोधी अभियान व आत्मसमर्पण योजनेमुळे २०२२ ते आतापर्यंत २९ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, उपमहानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, उपकमांडंट सुमीत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण मोहीम गतिमान झाली आहे.

Story img Loader