गडचिरोली : सुमारे ३०० कोटी रुपयांच्या मालमत्तेसाठी सुपारी देऊन वृध्द सासऱ्यांची थंड डोक्याने हत्या केल्याच्या आरोपाखाली गडचिरोली येथील नगररचना विभागाची सहायक संचालक अर्चना मनीष पुट्टेवार (पार्लेवार) हिला ६ जून रोजी नागपूरात अटक झाली. या महिला अधिकाऱ्याची गडचिरोलीतील कारकीर्दही वादग्रस्त असल्याची माहिती आता उजेडात आली आहे. केवळ पैशांच्या हव्यासापायी सराईत गुन्हेगाराप्रमाणे तिने सासऱ्यांना संपविल्याच्या घटनेने प्रशासकीय वर्तुळ हादरले आहे.

पुट्टेवार परिवारात तब्बल ३०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा वाद सुरू होता. २२ मे रोजी नागपुरात मानेवाडा चौकालगत कारच्या धडकेने पुरुषोत्तम पुट्टेवार (८२,रा.शुभनगर, मानेवाडा) यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सुरुवातीला अपघाती नोंद करुनच तपास केला, पण चौकशीत हा घातपात असल्याचे उजेडात आले. त्यानंतर याचे धागेदोरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून व गडचिरोली येथील नगररचना विभागात सहायक संचालक पदावर असलेल्या अर्चना पुट्टेवार हिच्यापर्यंत असल्याचे समोर आले. तिने चालक सार्थक बागडे यास सुपारी देऊन सचिन धार्मिक व नीरज उर्फ नाईंटी निमजे या दोघांच्या च्या मदतीने थंड डोक्याने कट रचून सासऱ्यांस संपविल्याचे उघडकीस आले. अर्चनाचा पती मनीष डॉक्टर असून सासू शकुंतला यांचे ऑपरेशन झाल्याने दवाखान्यात होत्या. पत्नीला भेटून घरी जाताना पुरुषोत्तम यांना कारने धडक देऊन अपघात भासविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.दरम्यान, अर्चना पुट्टेवार ही सध्या पोलीस कोठडीत आहे.

FIR, developer, Radhai illegal building, Nandivali Panchanand Dombivli, BJP party workers
डोंबिवली नांदिवली पंचानंंद येथील राधाई बेकायदा इमारतीच्या विकासकावर गुन्हा दाखल, भाजप कार्यकर्त्यांच्या अडचणीत वाढ
Navi Mumbai Police, Kharghar, Mobile shop theft, Juveniles detained, Stolen goods recovered CCTV footage, Criminal Investigation Department, kharaghar news, navi Mumbai news, latest news,
खारघर येथील चोरी प्रकरणात पावणेचार लाखांच्या मुद्देमालासह तीन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात 
bjp, illegal building
डोंबिवलीतील सागाव येथील बेकायदा इमारत तोडण्यास भाजप पदाधिकाऱ्यांचा अडथळा, उच्च न्यायालयाच्या इमारत तोडण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष
Pooja Khedkar Audi
Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी कार जप्त, कागदपत्र सादर करण्याचे निर्देश; ‘एवढ्या’ रुपयांचा दंडही ठोठावला!
land transfer, upper district collector,
जागा हस्तांतरणासाठी कोल्हापुरात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून १० लाखाची मागणी; भाजपच्या आरोपाने खळबळ
Salary hike for power company officers employees
वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतनवाढ
Central government  approves Rs 1898 crore loan proposal for sugar millers
सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांवर केंद्र सरकार मेहेरबान
Gadchiroli, demand for Investigation Missing Land Transaction Documents, Archana Parlewar, Archana Parlewar Alleged Scam Land Transaction Documents, Gadchiroli news
गडचिरोली : नगररचना विभागातील दस्ताऐवज धोक्यात? अर्चना पार्लेवार यांच्या कार्यकाळातील कागदपत्रे ताब्यात…

हेही वाचा…भंडारा : तरुणी तक्रार करायला गेली मात्र पोलीस अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केली, राजकीय वातावरण तापले

अनेक ‘अकृषक’ भूखंड संशयास्पद

जमिनीचा वापर औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी म्हणजेच नॉन ॲग्रीकल्चरकरता (एनए)करायचा असेल तर नगररचना विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. या परवान्यासाठी सहायक संचालक अर्चना पुट्टेवार हिचे दर ठरलेले होते, अशी माहिती प्लॉटिंग क्षेत्रातील सूत्रांनी दिली. फाईलवर ‘वजन’ ठेवल्याशिवाय ती पुढे सरकतच नव्हती. दररोज नगररचना कार्यालयात याद्वारे मोठी ‘उलाढाल’ होत असे. हेकेखोर स्वभावाच्या अर्चना पुट्टेवारचे कार्यालयीन सहकाऱ्यांशीही फारसे पटत नव्हते, असे सूत्रांनी सांगितले.

तक्रारी, पण कारवाई नाहीच

अर्चना पुट्टेवार हिची कार्यपध्दती वादग्रस्त होती, त्यामुळे तिच्याबद्दल अनेक तक्रारी नागपूरच्या वरिष्ठ कार्यालयात गेल्या होत्या. मात्र, या तक्रारींची ना चौकशी झाली ना कारवाई. तक्रारी दडपण्यासाठी ती वजन वापरत असे, त्यामुळे या तक्रारींवर कुठलीही कारवाई होत नसे. वरिष्ठ कार्यालयात तिला पाठीशी घालणारे कोण, याची चर्चा आहे.

हेही वाचा…चंद्रपूर : धानोरकरांच्या ‘त्या’ वक्तव्याने भाजपत अस्वस्थता……पडद्यामागे राहून…

अहेरी, गडचिरोलीतील ‘लेआऊट’ वादग्रस्त?

गडचिरोली शहराजवळील नवेगाव, मुडझा, कोटगल या भागालगत वैनगंगा नदी आहे. हा परिसर पूररेषेत येतो. मात्र, येथे भूमाफियांना हाताशी धरुन गडचिरोली आणि अहेरी उपविभागात अकृषक परवाने वाटण्याचा प्रताप अर्चना पुट्टेवार हिच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले जाते. भूमाफियांना तिने संरक्षण दिल्यानेच पूररेषेतील प्लॉटिंगलाही सोन्याचा भाव आला, या धोकादायक परिसरात मोठे इमले उभे राहिले. तिच्या कार्यकाळात दिलेल्या एनए परवान्यांची चौकशी झाल्यास मोठे गैरव्यवहार उजेडात येऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.