scorecardresearch

नागपूरकरांच्या सेवेत १७ इलेक्ट्रिक बसेस ; गडकरींच्या हस्ते लोकार्पण, बसमधूनही प्रवास

गडकरी म्हणाले, इलेक्ट्रिक,सीएजी इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा उपयोग सर्वसामान्यांनी करावा यासाठी या वाहनांच्या किंमती कराव्या.

नागपूरकरांच्या सेवेत १७ इलेक्ट्रिक बसेस ; गडकरींच्या हस्ते लोकार्पण, बसमधूनही प्रवास
( इलेक्ट्रिक तसेच डिजिटल बस सेवेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले )

पर्यावरण पूरक वाहानांच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न वाहन निर्मिती कंपन्यांनी करावा,असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

महापालिकच्या परिवहन विभागाच्या वाहन ताफ्यात दाखल १७ इलेक्ट्रिक तसेच डिजिटल बस सेवेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे उपस्थित होते. याप्रसंगी गडकरी यांनी झिरो माईल चौक ते जिपीओ चौकपर्यत बसमधून प्रवास केला.

गडकरी म्हणाले, इलेक्ट्रिक,सीएजी इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा उपयोग सर्वसामान्यांनी करावा यासाठी या वाहनांच्या किंमती कराव्या.यामुळे विक्री वाढेल. देशात इलेक्ट्रिक वाहने तयार करणाऱ्या कपन्यांची संख्या २५० च्या जवळपास झाली आहे. दुचाकी वाहने इलेक्ट्रिक आणि इथेनॉलपासून चालवली गेली तर प्रदूषणपासून मुक्ती मिळेल. देशात इलेक्ट्रीक, मिथेनॉल, सीएनजी हे देशाचे भविष्य असून त्यापासून रोजगार निर्माण आणि गाव प्रदूषण मुक्त होईल असेही गडकरी म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या