scorecardresearch

Premium

नागपूर : थेट उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीतच गडकरींनी सादर केले राष्ट्रसंताचे ‘ते’ प्रसिद्ध भजन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी समारंभ रविवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

Gadkari bhajan tukdoji maharaj
नागपूर : थेट उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीतच गडकरींनी सादर केले राष्ट्रसंताचे 'ते' प्रसिद्ध भजन (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी समारंभ रविवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. हा समारंभ अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

कार्यक्रमाला उपस्थित राज्यपाल, केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री आदी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींमुळे वातावरणात एक प्रकारचे दडपण होते. पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाच्या काही ओळींनी केली आणि वातावरणातील ताण दूर झाला. उपस्थितांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. गडकरी यांनी सादर केलेले ते प्रसिद्ध भजन पुढील प्रमाणे –

Eknath Shinde and J P Nadda
महायुतीच्या जागावाटपाचा पेच सुटला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यात एक तास चर्चा
dcm devendra fadnavis on maratha reservation solution
‘मागची दहा वर्षे ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी’, मोदींच्या तिसऱ्या टर्मबद्दल फडणवीस म्हणाले…
Baba Sidiqui
मिलिंद देवरांनंतर काँग्रेसला आणखी एक धक्का, बाबा सिद्दीकी अजित पवार गटाच्या वाटेवर?
vinod tawde bjp
चर्चेतील चेहरा : विनोद तावडे.. राष्ट्रीय राजकारणातील संधी साधत दमदार वाटचाल

मनी नाही भाव, म्हणे देवा ! मला पाव।
देवा अशानं भेटायचा नाही रे !
देव बाजारचा भाजीपाला नाही रे ! ।।
मातीचा देव त्याला पाण्याचं भेव ।
सोन्या-चांदीचा देव त्याला चोराचं भेव ।
लाकडाचा देव, त्याला अग्नीचं भेव ।
देव बाजारचा भाजीपाला  नाही रे ।।

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gadkari performed the famous bhajan of tukdoji maharaj in the presence of the vice president jagdeep dhankhar cwb 76 ssb

First published on: 05-08-2023 at 11:41 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×