scorecardresearch

Premium

अद्भूत! टॅबलेट, कॅप्सूलपासून साकारले गणराय, मोताळ्यातील ‘फार्मासिस्ट’ची अनोखी कलाकृती; दर्शनासाठी भाविकांची रीघ

मोताळा येथील एका औषधी विक्री केंद्र (मेडिकल स्टोअर्स) चालकाने औषधी टॅबलेट, कॅप्सूलचा वापर करून गणरायाची मूर्ती साकारली आहे.

Ganapati made from tablets
अद्भूत! टॅबलेट, कॅप्सूलपासून साकारले गणराय, मोताळ्यातील ‘फार्मासिस्ट’ची अनोखी कलाकृती; दर्शनासाठी भाविकांची रीघ (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

बुलढाणा : जिल्ह्यातील मोताळा येथील एका औषधी विक्री केंद्र (मेडिकल स्टोअर्स) चालकाने औषधी टॅबलेट, कॅप्सूलचा वापर करून गणरायाची मूर्ती साकारली आहे. त्याने आपल्या घरी या अनोख्या गणेशाची स्थापना केली असून दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे. फार्मासिस्टच्या या आगळ्यावेगळ्या कलेने सर्वांना भुरळ घातली आहे.

हेही वाचा – वेडसर, निराधार वृध्दाच्या संशयास्पद भटकंतीचा शेवट…

mns mla along with the villagers meet tmc commissioner
भंडार्ली कचराभूमीचा वाद पेटला; मनसे आमदारासह ग्रामस्थांनी घेतली आयुक्तांची भेट
mns mla pramod patil warn car burn to tmc if bhandarli dumping ground not close
भंडार्ली कचराभूमी बंद करा अन्यथा वाहने जाळू; मनसे आमदार प्रमोद पाटील यांचा ठाणे पालिकेला इशारा
Rangoli based on cybercrime
पुण्यातील विसर्जन मिरवणुक मार्गावर राष्ट्रीय कला अकादमीने सायबर क्राईमवर आधारित साकारल्या रांगोळी
pimpri chinchwad ganeshotsav 2023, ganesh visarjan pimpri chinchwad, ganesh murti sankalan kendra for ganesh visarjan
पिंपरी-चिंचवडमध्ये मूर्तिदान, निर्माल्य संकलनासाठी रथ; विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथक

हेही वाचा – पाच मित्रांची यशोगाथा! एकत्र अभ्यास केला अन् एकाच वेळी एमपीएससीच्या दोन परीक्षेत घवघवीत यश

दिपक शेळके पाटील असे या व्यावसायिकाचे नाव आहे. मोताळा तालुक्यातील ग्राम भोरटेक येथील रहिवासी असलेले शेळके अलीकडे मोताळा येथे स्थायिक झाले आहे. बसस्थानक परिसरात त्यांचे स्वराज जेनरिक मेडिकल आहे. त्यांनी व्यवसाय सांभाळून कलाकृती निर्मितीचा छंद जोपासला आहे. त्यांनी तयार केलेली मूर्ती यंदाच्या गणेशोत्सवाचे आकर्षण ठरले आहे. कमालीची एकाग्रता राखत ही मूर्ती तयार करावी लागते. थोडीदेखील चूक झाल्यास पुन्हा नव्याने काम करावे लागते, असे शेळके यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ganapati made from tablets capsules a unique work of art of pharmacist from motala buldhan scm 61 ssb

First published on: 21-09-2023 at 12:58 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×