scorecardresearch

Premium

भंडारा : ‘त्या’ भिक्षेकरांची स्व-जिल्ह्यात रवानगी, पोलीस अधीक्षकानी घेतली लोकसत्ताच्या वृत्ताची दखल

काल रात्री भिक्षेकऱ्यांच्या टोळीची त्यांच्या जिल्ह्यात रवानगी करण्यात आली. तसेच परत न येण्याची सक्त ताकीद देण्यात आली.

gang of beggars Bhandara
भंडारा : 'त्या' भिक्षेकरांची स्व-जिल्ह्यात रवानगी, पोलीस अधीक्षकानी घेतली लोकसत्ताच्या वृत्ताची दखल (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

भंडारा : ‘ड्रग्स-गांजाचे सेवन आणि विक्री करणारी भिक्षेकारांची टोळी शहरात सक्रिय’ या मथळ्याखाली दै. लोकसत्ताने दोन दिवसांपूर्वी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी भंडाऱ्याचे ठाणेदार सुभाष बारसे यांना कारवाईचे आदेश दिले. अखेर काल रात्री या भिक्षेकऱ्यांच्या टोळीची त्यांच्या जिल्ह्यात रवानगी करण्यात आली. तसेच परत न येण्याची सक्त ताकीद देण्यात आली.

गोंदिया जिल्ह्यातील काचेवानी येथील फकीर टोळीचे हे भिकारी मागील अनेक महिन्यांपासून भंडारा येथे वास्तव्यास होते. भिक्षा मागण्याच्या नावाखाली ते लोकांना धमकावत असल्याची तसेच ड्रग्स गांजाचे सेवन आणि विक्री करीत असल्याची पुराव्यानिशी गोपनीय माहिती मिळताच लोकसत्ताने दि. ६ मार्च रोजी या संदर्भात वृत प्रकाशित केले होते.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

हेही वाचा – नागपूरमध्ये गडकरींच्या दाव्याला भाजपाकडूनच खो!

या वृत्ताची गंभीर दखल घेत आणि कर्तव्यतत्परता दाखवत पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी भंडारा पोलिसांना सत्यता पडताळून योग्य ते कारवाईचे आदेश दिले. त्या अनुषंगाने ठाणेदार बारसे यांनी त्यांच्या चमूसह नगर पालिकेच्या क्रीडा मैदानावर तळ ठोकून बसलेल्या भिक्षेकऱ्याना त्यांच्या जिल्ह्यात परत जाण्यास सांगितले. तसेच स्वतः समक्ष त्यांची रवानगी करून मैदान रिकामे केले.

हेही वाचा – शालेय पुस्तकातील कोरी पृष्ठे ठरणार पाल्यांवर देखरेख ठेवण्याची संधी !

पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे, तर लहान मुलांनी आनंद व्यक्त केला आहे. सोबतच या भिक्षेकऱ्यांकडून गांजा आणि ड्रग्स घेऊन शहरात विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीदेखील केली जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gang of beggars sent back from bhandara to their district ksn 82 ssb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×