माझा फोन उचलत का नाही, असे विचारत गुंडाचा तरुणीवर...|gangster tries sexually assault young woman one sided love not picking up phone crime midc police nagpur | Loksatta

माझा फोन उचलत का नाही, असे विचारत एकतर्फी प्रेमातून गुंडाचा तरुणीवर…

तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून शुभमला अटक केली. न्यायालयाने शुभमला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

माझा फोन उचलत का नाही, असे विचारत एकतर्फी प्रेमातून गुंडाचा तरुणीवर…
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

नागपूर : एकतर्फी प्रेमातून एका गुंडाने तरुणीचा छळ सुरू केला. फोनवर प्रतिसाद देत नसल्याने तो थेट तिच्या घरात घुसला. ठार मारण्याची धमकी देत अश्लील चाळे सुरू केले. बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरड केली असता आरोपीने पळ काढला. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत घडली. शुभम महादेव प्रधान (२८) रा. आयसी चौक, हिंगणा रोड असे अटकेतील गुंडाचे नाव आहे.

शुभमवर खून, खुनाचा प्रयत्न, चोरी आणि जबरी चोरीसह एक डझनहून अधिक गुन्हे नोंद आहेत. परिसरात राहणाऱ्या पीडितेवर त्याचे एकतर्फी प्रेम आहे. तो कधीही पीडितेला फोन करून त्रास देत होता. त्यामुळे पीडितेने त्याचा नंबर ब्लॉक केला. प्रतिसाद मिळत नसल्याने शुभम चिडला. रात्री ९ वाजताच्या सुमारास तो पीडितेच्या घरात घुसला. ‘माझा फोन उचलत का नाही’ असे म्हणून शिवीगाळ करू लागला. लग्नाची मागणी घालून नकार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा: ‘भारत जोडो’चे पडद्यामागील किस्से आणि व्यवस्थापन यंत्रणेचे अनुभव

तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करू लागला. तरुणीने मदतीसाठी ओरड केली असता शुभमने पळ काढला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. एमआयडीसी पोलीस घटनास्थळावर पोहोचले. तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून शुभमला अटक केली. न्यायालयाने शुभमला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 09:12 IST
Next Story
‘हॅलो, तुमच्यावर असलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीवर चर्चा सुरू आहे…’; खंडणीसाठी धवनकर कुलगुरू कक्षातून करायचे संपर्क