जागतिक महिला दिनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गायत्री रामटेके या मुलीने समाज माध्यमावर स्वतःचा फोटो सार्वत्रिक करीत गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. घुटकाला प्रभागात राहणाऱ्या गायत्री रामटेके या तरुणीने घरीच गळफास घेतला. ग्रामीण भागातून ही तरुणी चंद्रपुरात शिक्षण घ्यायला आली होती.
हेही वाचा >>> यवतमाळ : वणी तालुक्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
शहरातील घुटकाला वार्डात गायत्री भाड्याच्या घरात राहत होती.तिने स्वतःचा सिंदूर असलेला फोटो सार्वत्रिक केला होता. तिच्या या फोटोवर अनेक मैत्रिणींनी लग्न झालं का? असा प्रश्न विचारला. त्या पोस्टमध्ये गायत्री ने ‘हा माझा शेवटचा फोटो’ असे लिहले आहे. सदर आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, पुढील तपास शहर पोलीस करीत आहे. दरम्यान, मुलीने लग्न केले होते का याचाही शोध पोलीस घेत आहे.