scorecardresearch

Premium

अमरावती: कॉलेजला दांडी अन ‘ती’ प्रियकरासोबत चहाच्या टपरीवर…

समाज माध्‍यमावर ओळख झाल्यावर त्या दोघांचे प्रेमसूत जुळले. त्यानंतर त्याने तिला कॉलेजला जाऊ नको, मला तुझ्यासोबत वेळ घालवयाचा आहे, असे म्हटले.

crime news
सीएसएमटी-कल्याण दरम्यान हावडा मेलमध्ये फेरीवाल्यांनी प्रवाशाला लुटले(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

समाज माध्‍यमावर ओळख झाल्यावर त्या दोघांचे प्रेमसूत जुळले. त्यानंतर त्याने तिला कॉलेजला जाऊ नको, मला तुझ्यासोबत वेळ घालवयाचा आहे, असे म्हटले. मग काय, तिने दररोज कॉलेजला दांडी मारत त्याच्यासोबत फिरणे व चहा, नाश्त्याच्या टपरीवर वेळ घालविणे सुरू केले. तब्बल दोन महिने हा प्रकार चालला. अशात तिच्या वडिलांना कॉलेजमधून फोन कॉल आला. त्यानुसार वडील तिच्यासोबत कॉलेजमध्ये गेले. यावेळी तुमची मुलगी दोन महिन्यांपासून कॉलेजला येत नसल्याचे प्राध्यापकांनी सांगितले. हा प्रकार कळताच वडिलांना धक्काच बसला.

हेही वाचा >>>पोलीस हवालदारांची पदोन्नती अखेर मार्गी

Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान
Love to eat peanut Chiki Viral video from factory think 100 times before eating it
शेंगदाण्याची चिक्की खायला आवडते का? फॅक्टरीमधील व्हायरल व्हिडीओ पाहून चिक्की खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल

वडिलांनी विचारणा केल्यावर एक तरुण तिला कॉलेजमध्ये जाण्यास रोखून चहा, नाश्त्याच्या टपरीवर फिरवित असल्याचे समोर आले. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून बडनेरा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज अशोक खंडारे (१९) रा. विलासनगर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी व राजची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. दोघांमध्‍ये प्रेमसंबंध जुळले. तो दररोज तिला कॉलेजला जाऊ न देता बळजबरीने आपल्यासोबत फिरवित होता. तिला कॉलेजच्या परिसरात भेटत होता.

हेही वाचा >>>भंडारा : भरधाव ट्रेलरच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

दरम्यान, कॉलेजमधून तिच्या वडिलांना फोन आल्‍यानंतर वडील तिच्यासोबत कॉलेजमध्ये गेले. यावेळी तुमची मुलगी मागील दोन महिन्यांपासून कॉलेजमध्ये येत नसल्याचे तिच्या वडिलांना सांगण्यात आले. हा धक्कादायक प्रकार कळताच वडिलांनी प्राध्यापकांसमोर तिला याबाबत विचारणा केली. यावेळी तिने राज व त्याच्या प्रतापाबाबत वडिलांना सांगितले. राजने आपल्याला मोबाइलसुद्धा घेऊन दिला. तो नेहमी मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे म्हणायचा. त्यावर तू मला भेटायला येऊ नकोस, मला तुझ्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाही, असे म्हटल्यावर त्याने तू माझ्यासोबत बोलली नाही, भेटली नाही, तर जिवाने मारून टाकेन किंवा स्वत:च्या जिवाचे कमी जास्त करेल, अशी धमकी आपल्याला दिली, असे तिने सांगितले. त्यानंतर पीडित मुलीने बडनेरा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजविरुद्ध विनयभंग, धमकी व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girl took a leave from college to hang out with her boyfriend mma 73 amy

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×