नागपूर : बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या प्रेयसी काजल ऊर्फ कविता देवी श्रीवास्तव, तिचे आईवडील शिवनरेश श्रीवास्तव-गुडीया श्रीवास्तव आणि रमेश सोनार यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. चौघांनाही कळमना पोलिसांनी अटक केली. हेही वाचा - नागपूर : मैदानात जलकुंभाचे काम, ‘श्री’ची प्रतिष्ठापना करायची कुठे? हेही वाचा - …अन् माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांगलेच भारावले! नेमकं काय घडलं? वाचा… मनिष ऊर्फ राज रामपाल यादव (३५, मिनीमातानगर) या युवकाने फेसबुक लाईव्ह करीत कन्हान नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. मनिष यादवचे इतवारीत इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे विक्रीचे दुकान आहे. विवाहित असलेल्या मनिषचे गेल्या दीड वर्षांपासून काजलशी प्रेमसंबंध होते. काजलने आई-वडिलांना हाताशी धरुन मनिषकडून पाच लाखांची खंडणी वसूल करण्याचा कट रचला. त्यात फोटोग्राफर रमेश सोनार यालाही सहभागी करून घेतले. काजल सर्वांना घेऊन मनिषच्या घरी आली. तिने बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देऊन ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यामुळे दहशतीत आलेल्या मनिषने कन्हान नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली.