चंद्रपूर : येथील ध्येयवेड्या तरुणांनी ‘बस टॅप करो’ या नावाने कंपनी स्थापन करून ‘एनएफसी बिझनेस कार्ड्स’च्या माध्यमातून ‘नेटवर्क मार्केटिंग’चे चित्रच पालटले. त्यांनी एका ‘क्लिक’वर संपूर्ण प्रतिष्ठान, आस्थापना, व्यवसायाची संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निखिल संघपाल कांबळे व दीक्षांत कांबळे या दोन भांवडांनी ही कंपनी स्थापन केली. निखिलने मेकॅनिकल शाखेत अभियांत्रिकी पदवी आणि एम.टेक. चे शिक्षण घेतले. त्यानंतर तो फोटोग्राफीच्या व्यवसायाकडे वळला. मात्र, या व्यवसायात त्यांचे मन रमले नाही. त्यामुळे त्याने हा व्यवसाय अल्पावधीतच बंद केला. लहान व्यावसायिक व प्रतिष्ठाने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरत असून त्यांच्याकडे कोणताही ‘डिजिटल प्लॅर्टफार्म’ उपलब्ध नसल्याचे त्याच्या लक्षात आले. बस टॅप करो नावाची कल्पना सुचली. नोंदणीनंतर ही कंपनी जानेवारी २०२४ मध्ये अस्तित्वात आली.

हेही वाचा – अमरावतीत १४९ एसटी बसेस भंगारात; कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल

हेही वाचा – विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ

पर्यावरणपूरक पर्याय

‘बस टॅप करो’चा अत्याधुनिक ‘एनएफसी डिजिटल बिझनेस कार्ड्स’ उपब्लध करून देण्यात येत आहे. हा कार्ड कागदी बिझनेस कार्ड्सला पर्याय ठरला आहे. हे कार्ड्स पर्यावरणपूरक असून एका ‘क्लिक’वर प्रतिष्ठाने, व्यवसायांचा संपूर्ण तपशील भ्रमणध्वनीत पाहता येणार आहे.