नागपूर विभागीय अंतिम फेरीत गोकुळ कुमटकर प्रथम

अत्यंत अटीतटीच्या ठरलेल्या या स्पर्धेत नागपूर,अमरावती, अकोला, यवतमाळसह संपूर्ण विदर्भातून स्पर्धक सहभागी झाले होते. 

विभागीय अंतिम फेरीच्या विजेत्यांसह प्रमुख पाहुणे डॉ. पिनाक दंदे, परीक्षक प्रा. प्रमोद मुनघाटे, अ‍ॅड. तृप्ती दीक्षित.

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या सोमवारी झालेल्या  नागपूर विभागीय अंतिम फेरीत नागपूरच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सचा विद्यार्थी गोकुळ कुमटकर याने प्रथम क्रमांक पटकावला. येत्या १७ मार्चला मुंबई येथे आयोजित महाअंतिम फेरीसाठी तो पात्र ठरला आहे.

अत्यंत अटीतटीच्या ठरलेल्या या स्पर्धेत नागपूर,अमरावती, अकोला, यवतमाळसह संपूर्ण विदर्भातून स्पर्धक सहभागी झाले होते.  प्राथमिक फेरीतून २० स्पर्धकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. ‘खेळातील परके शेजारी’, ‘लक्ष्यभेद-नवा पर्याय’ या विषयाला फारसा हात न घालता ‘‘गलीबॉय’चे भवितव्य’ आणि ‘पुढारलेल्यांचे आरक्षण’या दोन विषयांवरच स्पर्धकांनी अधिक भर दिला. वर्तमानातील ज्वलंत विषय स्पध्रेत असतानाही विद्यार्थ्यांची तयारी मात्र चांगली होती. परीक्षकांसह स्पध्रेला आलेल्या रसिकश्रोत्यांनी देखील त्याला दाद दिली. विभागीय अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून प्रा. प्रमोद मुनघाटे व अ‍ॅड. तृप्ती दीक्षित यांनी काम पाहिले.

पारितोषिक वितरण सोहोळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पिनाक दंदे, लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचे प्रमुख देवेंद्र गावंडे, वितरण विभागाचे उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र रानडे, जाहिरात विभागाचे महाव्यवस्थापक सारंग पाटील व्यासपीठावर होते.

* प्रथम – गोकुळ कुमटकर – इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, नागपूर

* द्वितीय – वर्षां जाधव – शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती

* तृतीय – मंथन बिजवे – कृषी महाविद्यालय, अकोला

* उत्तेजनार्थ प्रथम – नेहा हटवार – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर

* उत्तेजनार्थ द्वितीय – माधवी जांबकर, प्रा. राम मेघे महाविद्यालय, अमरावती

प्रायोजक

पितांबरी कंठवटी प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेचे असोसिएट पार्टनर श्री धूतपापेश्वर आणि पुनीत बालन एन्टरटेन्मेंट प्रा. लिमिटेड, तर पावर्ड बाय पार्टनर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन्स लिमिटेड आहेत. या स्पर्धेचे पावर्ड बाय पार्टनर वास्तु रविराज आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स आणि जनसेवा सहकारी बँक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gokul kutkar first in the nagpur divisional final vakta das sahasreshu