नागपूर : सोने- चांदीचे दर सलग दुसऱ्या दिवशीही घसरले आहे. चांदीच्या दरात २४ तासांत प्रति किलो ७६ हजारांची घसरण झाली आहे. तर सोन्याचे दरही प्रति दहा ग्राम १४ हजार रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारतीयांना सोने- चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण आहे. विविध सनासुदीत बरेच भारतीय सोने- चांदीचे दागिने, देवी- देवतांची मुर्तीसह इतरही वस्तू खरेदी करतात. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात ३० जानेवारीला जीएसटी व मेकिंग शुल्क वगळता सोन्याचे दर २४ कॅरेटमध्ये प्रति दहा ग्राम १ लाख ७४ हजार १०० रुपये, २२ कॅरेटमध्ये १ लाख ६१ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटमध्ये १ लाख ३४ हजार १०० रूपये, १४ कॅरेटमध्ये १ लाख ५ हजार ३०० रुपये, ९ कॅरेटमध्ये ६९ हजार ६०० रुपये होते.
हे दुसऱ्याच दिवशी आज ३१ जानेवारी २०२५ रोजी २४ कॅरेटमध्ये प्रति दहा ग्राम १ लाख ६० हजार १०० रुपये, २२ कॅरेटमध्ये १ लाख ४८ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटमध्ये १ लाख २३ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ९६ हजार ९०० रुपये, ९ कॅरेटमध्ये ६४ हजार रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याचे दर ३० जानेवारीच्या तुलनेत ३१ जानेवारीला २४ कॅरेटमध्ये प्रति दहा ग्राम १४ हजार रुपये, २२ कॅरेटमध्ये १३ हजार रुपये, १८ कॅरेटमध्ये १० हजार ८०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ८ हजार ४०० रुपये, ९ ग्राममध्ये ५ हजार ६०० रुपये घसरले आहे.
चांदीच्या दरात मोठी आपटी…
नागपुरातील सराफा बाजारात चांदीचे दर ३० जानेवारीला जीएसटी आणि मेकिंग शुल्क वगळून प्रति किलो ३ लाख ७९ हजार ५०० रुपये होते. हे दर ३१ जानेवारीला प्रति किलो ३ लाख २ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात ३० जानेवारीच्या तुलनेत ३१ जानेवारीला चांदीचे दर प्रति किलो ७६ हजार ७०० रुपयांनी घसरले आहे.
प्लॅटिनमच्या दरात मात्र…
प्लॅटिनम धातूचे दर ३० जानेवारीला प्रति दहा ग्राम ९० हजार रुपये होते. ३१ जानेवारीला हे दर ९० हजार रुपयेच असल्याने दर स्थित होते.

