लोकसत्ता टीम

नागपूर : नागपूरसह देशभरात सातत्याने सोन्याच्या दरात बदल होत असल्याने ग्राहकांमध्येही दागिने खरेदीबाबत संभ्रम आहे. २४ तासांपूर्वी २१ जून २०२४ रोजी सकाळी नागपुरातील सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात उसळी बघायला मिळाली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी हे दर प्रति दहा ग्राम सुमारे १ हजार ते १,२०० रुपयांनी खाली घसरले आहे. त्यामुळे शनिवारी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Gold Silver Price on 13 June 2024
Gold-Silver Price: बाजारपेठेत सोन्याचे भाव गडगडले, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमचा दर आता… 
Gold-Silver Price
Gold-Silver Price: अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याच्या दरात बदल; मुंबईतील १० ग्रॅमची किंमत आता…  
Gold Silver Price Today
Gold-Silver Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमचा भाव काय?
Gold Silver Price 26 June 2024
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! चांदी झाली स्वस्त; तर मुंबई-पुण्यात १० ग्रॅम सोन्याचा भाव काय?
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Gold Silver Price 21 June
Gold-Silver Price: वटपौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या दरात बदल; मुंबई-पुण्यात १० ग्रॅमसाठी किती पैसै मोजावे लागणार?
Gold Silver Price Today
Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किंचित वाढ, जाणून घ्या मुंबई-पुण्यातील १० ग्रॅम सोन्याची किंमत
Gold-Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाचा दिवस! सोने झाले स्वस्त, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅम सोन्याचा भाव तपासा

नागपूरसह राज्यातील बहुतांश भागात विवाह सोहळे, वाढदिवस, लहान मुलाचे बारसेसह इतरही कार्यक्रमांमध्ये अनेक कटुंबात सोन्याचे दागिने भेट दिली जातात. त्यामुळे आताही या कार्यक्रमासाठी नागरिकांकडून कमी- अधिक प्रमाणात सोन्याचे दागिने खरेदी केले जात आहे.

आणखी वाचा-बुलढाणा : वृध्द पुरात वाहून गेला; शोधमोहीम सुरू

त्यामुळे आताही नागपुरातील सराफा व्यावसायिकांकडे गर्दी आहे. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात २२ जूनला सकाळी ११ वाजता २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ७१ हजार ८००, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ८००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ७०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ८९ हजार रुपये होता.

दरम्यान नागपुरात २१ जूनला सराफा बाजार उघडल्यावर सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी ७३ हजार रूपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार ९००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ५०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ९१ हजार ०० रुपये होता. त्यामुळे २२ जूनच्या तुलनेत २१ जून २०२४ रोजीचे दर बघितल्यास नागपुरात सोने- चांदीच्या दरात चांगलीच घसरण बघायला मिळत आहे.

आणखी वाचा-नागपूर : एकटेपणातून नैराश्य; आयुष्याला कंटाळून वृद्ध पती-पत्नीने घेतला गळफास

वरील आकडेवारीनुसार २४ तासांत २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी १ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी १ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ८०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो २ हजार ४०० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे शनिवारी ग्राहकांना सोने खरेदीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान नागपुरातील सराफा व्यवसायिकांनी सध्या सोने- चांदीच्या दरात घट झालेली दिसत असली तरी ती लवकरच वाढण्याचे संकेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सध्या घसरलेले दर ग्राहकांना दागिने खरेदीची चांगली संधी असल्याचा त्यांचा दावा आहे.