नागपूर : गणेशोत्सवात नागपूर जिल्ह्यात सोन्याच्या दरात बऱ्याचदा चढ-उतार बघायला मिळाला. परंतु गणेशोत्सवानंतर ३० सप्टेंबरला सकाळी १०.२६ वाजता नागपुरात सोन्याचे दर घसरून केवळ ५७ हजार ८०० रुपये प्रति दहा ग्रामवर खाली घसरले.
हेही वाचा – ‘टीस’चा अहवाल सरकार उघड करीत नाही? धनगर, धनगड नेमका काय आहे घोळ?
नागपूर सराफा बाजारातील दरानुसार ३० सप्टेंबर २०२३ रोजी येथे प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ५७ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५४ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४६ हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३७ हजार ६०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७० हजार ३०० रुपये होते. हे सोन्याचे दर २५ सप्टेंबर २०२३ रोजी नागपुरात प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ५९ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५६ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार ६०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७३ हजार ५०० रुपये होते. हे सोन्याचे दर १९ जुलै २०२३ रोजी नागपुरात प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ६० हजार १०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५७ हजार १०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४८ हजार १०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७६ हजार ४०० रुपये होते. या वृत्ताला नागपुरातील रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी दुजोरा दिला.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold prices fell after ganesh utsav know today rates mnb 82 ssb