लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी मोर्शीत ११ लाख ३६ हजार ८०० रुपये, परतवाड्यात ८ लाख रुपये तर चांदूर रेल्वेत १ लाख ४२ हजार २४० रुपयांची रोकड जप्त केली. गेल्या चोवीस तासांत कारवाई करताना पोलिसांना ही रोख रक्कम सापडली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात प्रभावी गस्त सुरू आहे. अशात मंगळवारी रात्री मोर्शी ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार यांच्या नेतृत्वातील पथकाला मतदारांना वाटप करण्यासाठी एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात रोकड नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली.
आणखी वाचा-योगी आदित्यनाथ म्हणतात,‘ हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर दगडफेक करणाऱ्यांना धडा…’
या माहितीच्या आधारावर पथकाने सिंभोरा चौकात सापळा रचून संशयास्पद चारचाकी वाहन थांबवून तपासणी केली. तपासणीत वाहनात ११ लाख ३६ हजार ८०० रुपयांची रोकड आढळून आली. वाहनातील व्यक्तीला रोकडबाबत विचारणा करण्यात आल्यावर तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे पथकाने रोकड जप्त केली. याबाबत आयकर विभागालासुद्धा माहिती देण्यात आली.
त्याचवेळी परतवाडा ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वातील पथकाने मंगळवारी एका दालमिलजवळ संशयास्पद दुचाकीस्वाराला थांबवून तपासणी केली. त्यावेळी त्याच्या दुचाकीवरील पिशवीत ८ लाखांची रोकड आढळून आली. दुचाकीस्वाराजवळ रोकडबाबत कुठलेही कागदपत्र मिळून न आल्याने ती जप्त करण्यात आली.
आणखी वाचा-“विरोधकांच्या महा‘अडाणी’ आघाडीला देश व धर्माची…” वाशीममध्ये कडाडले योगी आदित्यनाथ
त्याचप्रमाणे चांदूर रेल्वे ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या तस्लीम शेख यांच्या नेतृत्वातील पथकाने धामणगाव मार्गावर संशयास्पद दुचाकीस्वाराला थांबवून तपासणी केली. त्यावेळी दुचाकीच्या डिक्कीत १ लाख ४२ हजार २४० रुपयांची रोकड आढळून आली. दुचाकीस्वाराजवळ रोकडबाबत कुठलेही कागदपत्र नसल्याने ती जप्त करण्यात आली.
तिवसा तालुक्यातील वरखेड येथे स्थापन करण्यात आलेल्या चेक पोस्टवर मंगळवारी स्थिर निगरानी पथकाकडून सोने-चांदी वाहून नेणारे वाहन पकडण्यात आले. त्यावेळी वाहनातील तीन व्यक्तींजवळ सोन्या-चांदी संदर्भात कोणतेही दस्तऐवज उपलब्ध नव्हते. त्यामुळे वाहनासह सोने व चांदी जप्त करण्यात आली. चौकशीत व वाहनातील उपलब्ध कागदपत्रांवरून त्यात ४.३९२ किलो सोने व २२९.७१४ किलो चांदी असल्याचे समोर आले. सदर वाहन एका कंपनीच्या नागपूर येथील शाखेतून १६ ठिकाणी सोने व चांदी वितरित करण्यासाठी निघाल्याचे त्यातील एकाने पथकाला सांगितले.