गोंदिया शहरालगतच्या ग्राम मुर्री येथील एका ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल भलतेच संतापले. संतापाच्या भरात त्यांनी ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश कंगाले यांच्या कानशिलात लगावली. सोमवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास सूर्याटोला उपविभाग कार्यालयात ही घटना घडली. या घटनेनंतर गोंदिया तालुक्यांतील समस्त वीज अभियंत्यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविण्याची मागणी केली. यामुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण होते.

आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी –

मिळालेल्या माहितीनुसार, लगतच्या ग्राम मुर्री निवासी लारोकर यांच्यावर ११,००० रुपयांचे वीजबिल थकीत असून वीज अभियंता शुक्रवारी त्यांच्याकडे वसुलीसाठी गेले होते. यावर सोमवारी बिल भरतो, असे सांगत त्यांनी वेळ मागितली. मात्र, सोमवारी त्यांनी बिलाच्या रकमेतील ४००० रुपये भरतो व उर्वरित रक्कम नंतर भरणार, असे सांगितल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे संतापलेले आ. अग्रवाल महावितरणच्या सूर्याटोला येथील उपविभाग कार्यालयात धडकले. तेथे उपस्थित असलेल्या उपकार्यकारी अभियंत्यास त्यांच्या कार्यालयाबाहेर बोलावून त्यांनी चापटा मारल्या. याप्रकारामुळे संतापलेल्या वीज अभियंत्यांनी लगेच रामनगर पोलीस ठाणे गाठून आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच या घटनेला गांभीर्याने घेऊन अभियंत्यांनी असहकार आंदोलनही सुरू केले. गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार व त्यादरम्यान काही समस्या उद्भवल्यास त्यासाठी जबाबदार राहणार नाही, असा इशारा अभियंत्यांनी दिला. मात्र, याप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यामुळे रामनगर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

Salman Khan shooting case accused was found after calling the brother
सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

… अखेर अग्रवाल यांनी माफी मागितली –

यानंतर सोमवारी रात्री आमदार अग्रवाल यांच्या चाबी संघटनेचे व भाजपचे काही नेते व पदाधिकारी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. वीज वितरण कंपनीचे अधिकारी तसेच पीडित अभियंता व आमदार यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. चर्चेअंती आ. अग्रवाल यांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या आवारात उपस्थित महावितरण कर्मचाऱ्यांसमोर येऊन माफी मागितली व पुढे असे कृत्य होणार नाही, अशी हमी दिली. यानंतर हे प्रकरण समोपचाराने संपविण्यात आले.

मला जनतेच्या समस्या सोडवायच्या असतात – आमदार अग्रवाल

दरम्यान, आमदार अग्रवाल यांनी आपली बाजू मांडली. जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून भारनियमन नसतानाही भारनियमन केले जात आहे. यासंदर्भातही अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला परंतु व्यवस्थित उत्तर मिळाले नाही. सोमवारी संबधित ग्राहक लारोकर हे कार्यालयात आले तेव्हा माझ्या स्वीय सहायकाने अभियंत्यांशी बोलणी करून ते जेवढे पैसे भरत आहे तेवढे घ्या, उर्वरित रक्कम ते ८ दिवसात भरतील, असे सांगितले. मात्र, अभियंत्यांनी ऐकले नाही. त्यामुळे मी स्वत: वीजवितरण कार्यालय गाठले आणि तिथे कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करून त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. मी लोकप्रतिनिधी असून मला जनतेच्या समस्या सोडवायच्या असतात. अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करीत जनतेला त्रास देत असल्याचे सांगत, जर कुठला ग्राहक थकित रकमेच्या अर्धी रक्कम भरायला तयार असेल तर त्याचा वीजपुरवठा खंडित करता येत नाही, असेही आमदार अग्रवाल म्हणाले.
दरम्यान, आमदार अग्रवाल यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी आलेले महावितरणचे अभियंता राजेश कंगाले यांनी चर्चेअंती आपण तक्रार करणार नाही, असे लेखी दिले असल्याचे रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदेश केंजळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.