गोंदिया: शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना मंगळवार १७ जून रोजी सायंकाळच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा/हेटी येथे उघडकीस आली. आसाराम देऊ कांबळे (६०) रा. हेटी (पालेवाडा) ता. गोरेगाव असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने काही तासातच आरोपी दिनेश उर्फ भुरू चुन्नीलाल ताराम (२४) रा. हेटी/पालेवाडा यास ताब्यात घेतले. दरम्यान, जादुटोण्याच्या संशयावरून खून केल्याची कबुली आरोपीने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार आसाराम कांबळे हा मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास गावाजवळील जंगल शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेला असता सायंकाळी ६:३० वाजता पर्यंत घरी परतला नाही. तर शेळ्या मात्र घरी आल्याने आसारामच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांसह जंगलाकडे धाव घेतली. यावेळी त्यांना आसाराम चा मृतदेह आढळून आला. ही घटना जंगल शिवारातील असल्याने व आसारामच्या मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसून आल्याने प्रथमदर्शनी वाघ या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात त्याच्या मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करत गावकऱ्यांनी घटनेची माहिती गोरेगाव वन विभागाला दिली.

दरम्यान, वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता हा प्रकार त्यांना संशयास्पद आणि घातपाताच्या असल्याचे दिसून आले यावर त्यांनी गोरेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणी साठी गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले या प्रकरणी गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखा च्या पथकाला पाचारण करण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आहेरकर यांच्या पोलीस उप निरीक्षक सैदाने , महेश मेहर, राजेंद्र मिश्रा या पथका कडून गावात तपास केला असता मृत आसाराम कांबळे यांचा खुन देवेंद्र उर्फ भुरु ताराम याने केल्याची गोपनीय माहिती मिळाली. या आधारे आरोपी देवेंद्र उर्फ भुरु ताराम याचा शोध घेण्यासाठी हेटी जवळील (पालेवाडा), मुंडीपार, भंड़गा, हलबीटोला (गोरेगाव) येथे शोध पथके रवाना करण्यात आली असता, मंगळवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास आरोपी भुरु ताराम हा हलबीटोला (गोरेगाव) येथील आपल्या मावशीच्या घरी मिळून आला. यावेळी त्यास गुन्ह्याबाबत विचारणा केली असता, सुरुवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिल्यानंतर जादुटोनाच्या संशयावरून आसाराम कांबळे यास डोक्याच्या मागे लोखंडी कुऱ्हाडीने मारून खुन केल्याचे कबुली दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने आरोपी दिनेश उर्फ भुरू यास अटक करून गोरेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अपराध भारतीय न्याय संहिता – अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास गोरेगाव पोलिस करीत आहेत.